Maratha reservation : अजित पवारांनीच भुजबळांना मराठ्यांवर सोडलं; मनोज जरांगेंचा आरोप
Ajit Pawar : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा अद्यापही न सुटल्यानं मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 20 जानेवारीला आम्ही मुंबईत येणार, असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. तर कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) जरांगेंना इशारा दिला. त्यावरून आता जरांगेंनीही अजित पवारांना (Ajit Pawar) जशास तसं उत्तर दिलं.
Video: नटून-थटून बाहेर पडले अन् गोल गोल फिरले; पिंपरीतील नाट्यसंमेलनावर वंदना गुप्तेंची थेट नाराजी
आज माध्यमांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता जरांगे म्हणाले की, तुम्ही पहिल्यापासून तेच केलं आहे. आता तुमचं खरं रुप समोर आलं आहे. गप होता, काही बोलत नव्हता तेव्हा तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचं आम्हाला वाटलं होतं. पण, अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलं. पहिल्यापासून त्यांनी मराठ्यांच्या विरोधातच काम केलं. मराठ्याचं वाटोळ करायची त्यांची सवय आहे. मुंबईला जाण्यावर आम्ही ठाम आहोत. जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत अजित पवारांना उत्तर देईल, असं जरांगे म्हणाले.
तुम्हीच भुजबळांना मराठ्यांवर सोडलं
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, ही जरांगेची मागणी आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळांसह अख्ख्या ओबीसी समाजाने विरोध केला. यावरूनही जरांगेंनी अजित पवारांना घेरलं. ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या विरोधात तुम्ही आधीपासूनच काम केलं. त्यामुळंच तुमच्या पक्षातील भुजबळ मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होता. तुम्हीच भुजबळांना मराठ्यांवर सोडलं. आता तुमच्या बोलण्यावरून हेच लक्षात येतं असं जरांगे म्हणाले.
Video: नटून-थटून बाहेर पडले अन् गोल गोल फिरले; पिंपरीतील नाट्यसंमेलनावर वंदना गुप्तेंची थेट नाराजी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोर्चे निघत आहेत. आता मनोज जरांगे यांनीही आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढला आहे. 20 जानेवारीला मराठा समाज अंतरवली सराटीहून मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया देत सांगिलतं होतं की, मराठा आरक्षणाबाबत काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याची घोषणा करत आहेत. संविधानाने देश चालवला जातो, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवणार नाही, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, असा इशारा अजित परारांनी दिला होता.