Download App

‘भुजबळांचा बोलवता धनी कोण हे महाराष्ट्राला कळलंय’; सतेज पाटलांचे गंभीर आरोप

Satej Patil On Chagan Bhujbal : छगन भुजबळांचे बोलवते धनी कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय, हे सरकारचंच षडयंत्र असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा बांधव आणि मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी लावून धरलीयं तर भुजबळांकडून या मागणीला विरोध करण्यात येत आहे. त्यावर बोलताना सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गुजरात सरकारचा मोठा निर्णय! आता गिफ्ट सिटीतील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये करता येणार मद्यपान

सतेज पाटील म्हणाले, छगन भुजबळांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्रला कळलं आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचा हा सरकारचा षडयंत्र आहे. सरकारमधील एका मंत्र्याचे असं वक्तव्य अजून देखील थांबत नाही. म्हणजे हे सरकारचंच वक्तव्य आहे असे समजायचे का? असा सवालही सतेज पाटलांनी केला आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. सरकार वारंवार मराठा समाजाला तारखा देत आहे. 24 तारखेला कोर्टात टिकेल मराठा आरक्षण देतो असे सरकार म्हणाले होते. मराठा समाज आतुरतेने वाट बघत होता. मात्र, सरकारने त्यांची फसवणूक का केली. फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतो म्हणत आहेत मात्र, त्या अधिवेशनात काय चर्चा करणार? हे सरकार सांगत नाही.

बजरंग पुनिया परत करणार ‘पद्मश्री’! मी ‘सन्मानित’ म्हणून जगू शकणार नाही; मोदींना धाडलं पत्र

अधिवेशनामध्ये जुन्या योजनांना सजवून नव्याने सांगण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये झालं, यामुळे मराठा समाजाची ही फसवणूकच झाली असल्याचं सतेज पाटील म्हणाले आहेत. गेल्या वेळेस एक मार्चला आचारसंहिता लागली होती. यंदा देखील 5 मार्चपर्यंत आचारसंहिता लागेल असे वातावरण आहे. मग सरकारने 24 तारीख का दिली अनेक तरुण-तरुणी या तारखेच्या आशेवर होते मात्र सर्वांची फसवणूक झाली, असल्याचंही ते म्हणाले आहेत.

देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल :
देश हुकूमशाहीकडे चालला आहे. विरोधी खासदार नसताना तीन कायदे पास करण्यात आले. या तीन कायद्यांकडे बारकाईने लक्ष दिले असता खासदार निलंबित का केले याचे कारण लक्षात येईल. विरोधी खासदार असते तर हे कायदे पास झाले नसते. भविष्यात एखादा शब्द जरी विरोधात बोलला तर तो देशद्रोह ठरू शकतो म्हणून हा कायदा पास करण्यासाठी खासदारांना निलंबित केलं. तरुण अशा पद्धतीने संसदेत घुसतो त्यावरून सुरक्षा आणि यास अनेक प्रश्नांवर चर्चा होणे खासदारांची अपेक्षा होती मात्र, सरकार रोज नवीन एक इतिहास करत आहे. खासदार निलंबित करून देखील एक नवीन इतिहास त्यांनी केला असल्याच पाटील म्हणाले आहेत.

Tags

follow us