गुजरात सरकारचा मोठा निर्णय! आता गिफ्ट सिटीतील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये करता येणार मद्यपान

  • Written By: Published:
गुजरात सरकारचा मोठा निर्णय! आता गिफ्ट सिटीतील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये करता येणार मद्यपान

Wine and Dine In GIFT City: गुजरात राज्यामध्ये दारू पिणं किंवा दारूची विक्री करण्यावर बंदी आहे. मात्र, आता सरकारने मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये, तुम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये दारू पिऊ शकता. गुजरात सरकारने (Gujarat Govt) गुरुवारी यासाठी सशर्त मंजुरी दिली आहे. याबाबतची जीआरही सरकारने काढला आहे.

‘…पुन्हा रडत आलात तर ठोकून काढणार’; आंबडेकरांचा ‘इंडिया’ आघाडीला इशारा 

या अधिकृत जीआरमध्ये सांगितलं की, गिफ्ट सिटीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दारू पिण्याची परवानगी असेल. यासोबतच गिफ्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांशिवाय अधिकृतपणे येणारे पाहुणेही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा क्लबमध्ये दारूचे सेवन करू शकतात. प्रत्येक कंपनीच्या अधिकृत पाहुण्यांना त्या कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच दारू घेण्याची परवानगी असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

या जीआरमध्ये असंही नमुद केलं की, कर्मचारी आणि पाहुण्यांना गिफ्ट सिटीमधील हॉटेल, रेस्टॉरंट किंवा क्लबमध्ये दारू पिण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु हॉटेल/क्लब/रेस्टॉरंट्स हे दारूच्या बाटल्या विकू शकत नाहीत. गिफ्ट सिटीमदील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि क्लबला तिथे एफएल 3 परवाना मिळू शकेल.

Siddheshwar Yatra : संमती पोथी वाचणाचा वाद कोर्टात, यंदा कोण करणार संमती वाचन?

दरम्यान, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी हे भारतातील पहिले कार्यरत ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे. गिफ्ट सिटीमध्ये 200 हून अधिक कंपन्या आहेत.

गुजरातमध्ये दारूबंदी कशी सुरू झाली?

गुजरात हे दारूबंदी असलेले देशातील सर्वात जुने राज्य आहे. १९६० मध्ये महाराष्ट्रापासून गुजरात वेगळे झाल्यानंतर तिथं दारूबंदी सुरू झाली. गुजरात प्रोहिबिशन अॅक्टनुसार, परवान्याशिवाय मद्य खरेदी, विक्री किंवा सर्व्ह केल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ५ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. याशिवाय दारू प्यायल्यास १ ते ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube