छगन भुजबळांना HC चा मोठा दिलासा! बेनामी मालमत्तेप्रकरणी तक्रारी रद्द
Chagan Bhujbal : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांसह (Chagan Bhujbal) कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर चार तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. मात्र, आता भुजबळांसह कुटुंबियांवरील तक्रारी उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत.
भाजप अन् सेनेचे आमदार ‘रेशीमबागेत’ : आगामी निवडणुकांसाठी संघाकडून पाच मुद्द्यात कानमंत्र
भुजबळांसह कुटुंबियांविरोधात बेनामी बेहिशोबी अॅक्ट अंतर्गत तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींवरुन सप्टेंबर 2021 रोजी आयकर विभागाकडून (Income tax) विशेष न्यायालयात तात्पूरत्या स्वरुपात मालमत्ता जप्तही करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी उच्च न्यायालयात छगन भुजबळ आणि कुटुंबियांवर 2016 चा बेनामी संपत्ती कायदा लागू होत नसल्याचा युक्तिवाद भुजबळांच्या वकिलांकडून करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाने या तक्रारी रद्द केल्या आहेत. यामध्ये छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशी निगडीत या मालमत्ता होत्या.
उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत बेनामी कायद्यात सन 2016 मध्ये दुरुस्ती झाली. त्यानुसार या कायदा दुरुस्ती पूर्वीच्या आर्थिक व्यवहारांना तरतुदी पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाहीत, असं भुजबळांचे वकील आबाद पोंडा मांडल्यानंतर उच्च न्यायालयाने हा संदर्भ ग्राह्य धरत भुजबळांवरील तक्रारी रद्द केल्या आहेत.
महामंडळ अन् आयोगांवरील नियुक्त्या मार्गी लावा : गोगावलेंच्या नेतृत्वात आमदारांचे CM शिंदेंकडे लॉबिंग
उच्च न्यायालयाने आज चारही तक्रारी रद्द केल्या असून मालमत्ता जप्ती प्रकरणी उच्च न्यायालयाने मार्चमध्येच निर्वाळा देऊन दिलासा दिला होता. मात्र, तारखा पडत गेल्या आणि आयकर विभागाच्यावतीने वकील उपलब्ध नसल्याने या चार तक्रारींबाबत निर्णय घेण्यास विलंब लागला आहे. दरम्यान, आता आम्हाला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया भुजबळांच्या वकीलांनी दिली आहे.
सलीम कुत्ता प्रकरणात गिरीश महाजनांचं नाव, सभागृहात खडाजंगी, निलम गोऱ्हेंची परब, जगतापांना तंबी
दरम्यान, 4 डझन बनावट कंपन्यांच्या नावाखाली छगन भुजबळ यांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचा आरोप चार तक्रारींमध्ये होता. त्यानंतर आयकर विभागाकडून 2021 मध्ये भुजबळांसह कुटुंबियांवर कारवाई सुरु करण्यात आली होती.