Download App

Maratha Reservation : ‘ट्रिपल इंजिन सरकारच आरक्षण देणार’; गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार कटिबद्ध आहे. समाजाला टिकेल अशा पद्धतीचे आरक्षण देण्यासाठी सरकारला थोडा वेळ लागेल. परंतु, टिकेल असेच आरक्षण देऊ, असे मंत्री महाजन म्हणाले.

Maratha Reservation : अल्टिमेटम संपला! आजपासून जरांगे पाटील पुन्हा मैदानात, ठिकठिकाणी आंदोलन

महाजन यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाष्य केले. महाजन म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीचे काम सध्या सुरू आहे. यासाठी आणखी काही वेळ लागेल. आमचंच सरकार आरक्षण देणार आहे. त्यामुळे जरांगे यांनी उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही होणार नाही, असे महाजन म्हणाले.

आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे म्हणून तर आमच्या काळात मोर्चे निघाले. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची काही ठिकाणी गरज नाही असेही मत व्यक्त केले जात आहे. पण असे असले तरी मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. यासाठीही समिती अभ्यास करत असल्याचे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा समाजाला शाश्वत आणि टिकणारं आरक्षण हवं असेल तर त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागणार आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सरकार सकारात्मक आहे, मराठा समाजाला आरक्षण देईल तर हेच सरकार देईल.

‘शिवतीर्थावरच मेळावा घेऊ शकलो असतो पण..,’; CM शिंदेंनी सांगितलं खरं कारण

मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम संपला 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी उपोषणे सुरू केली जाणार आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदीही केली जाणार आहे.

follow us