Download App

Maratha Reservation : मनोज जरांगेंना उशिरापर्यंत सभा घेणं भोवलं; आयोजकांवर गुन्हा!

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजित जाहीर सभेतून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर सडकून टीका करीत असल्याचं दिसून येत आहेत. काल नांदेड, लातूरमध्ये मनोज जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. लातुरमध्ये जरांगेंची सभा यशस्वी पार पडली. मात्र, नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत सभा सुरु असल्याने सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री 10 नंतरही सभा सुरुच ठेवल्याने 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार….’; वडेट्टीवारांची मागणी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत दोन वेळा आमरण उपोषण केलं आहे. या दोन्ही उपोषणादरम्यान, मनोज जरांगे यांना सरकारने आश्वासित केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडल्याचं दिसून आलं आहे. मात्र, दुसऱ्या उपोषणावेळी जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभर मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी दौरा सुरु केला आहे. याच दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत त्यांना काल नांदेडमध्ये उशिरापर्यंत सभा घ्यावी लागली आहे.

 ‘अ‍ॅनिमल’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

या सभेत बोलताना ते म्हणाले, इथले अधिकारी नोंदी बघत नाहीत किंवा त्यासाठी वेळ देत नाहीत. मोडी लिपी अभ्यासक नसल्याने अधिकारी केवळ कागदांचे गठ्ठे काढणे आणि बांधून ठेवणे, हेच काम करत आहेत. आमच्या लेकराचं भविष्य महत्त्वाचं आहे. ज्यांना मोठे केले, तेच विरोधात गेल्यास पायाखाली तुडविण्यासही मागेपुढे पाहणार नाही. २४ डिसेंबरनंतर यांना गावात फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

राहुल गांधींनाही उत्तर द्यावं लागले, लुटलेला पै-पै परत करावा लागले; धीरज साहू प्रकरणी जेपी नड्डांची टीका

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि ओबीसी हक्कांसाठी भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्याकडून एल्गार सभाचं आयोजन केलं जातं. जरांगेही मागे हटालया तयार नाहीत. तिसऱ्या टप्यातील दौऱ्यानंतर आता त्यांनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची घोषणा केली. सध्या मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील प्रवास सुरु आहे.

follow us