‘अ‍ॅनिमल’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

 ‘अ‍ॅनिमल’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Animal Box Office Collection Day 10: संदीप रेड्डी वंगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ (Animal Movie ) चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली. या चित्रपटाने आतापर्यंत ‘पठाण’ आणि ‘टायगर 3’चे (Tiger 3) रेकॉर्ड तोडले आहेत. 10व्या दिवसाच्या कमाईनंतर, त्याने ‘गदर 2’चा ऑल टाइम बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office) रेकॉर्ड देखील मोडला आहे. जगभरात 700 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. येत्या काही दिवसांत ‘पठाण’ आणि ‘जवान’चे कलेक्शन रेकॉर्ड मोडतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)


बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनील्कच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ‘अ‍ॅनिमल’ ने 87. 56 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून, भारतातील त्याचे एकूण कलेक्शन 432.47 कोटी रुपये झाले आहे. यासोबतच या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. 10व्या दिवशी कमाई केल्यानंतर जगभरात 700 कोटींचा आकडा पार केला आहे. तर चित्रपटाचे एकूण बजेट 100 कोटी आहे.

‘गदर 2’ चा रेकॉर्ड मोडला

‘अ‍ॅनिमल’ने 10व्या दिवसाच्या कमाईनंतर सनी देओलच्या ‘गदर 2’ चा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने 50 दिवसांत 691.08 कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर ‘अ‍ॅनिमल’ने अवघ्या 10 दिवसांत कलेक्शन रेकॉर्ड मोडला आहे. त्याचे एकूण बजेट 60 कोटी होते.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी घेतली आशाताईंची भेट.. असा होता भेटीचा सोहळा

‘अॅनिमल’च्या 9 दिवसांच्या कलेक्शनवर नजर टाकली तर पहिल्या दिवशी 63.8 कोटी, दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटी, आठव्या दिवशी 22.95 कोटी आणि नवव्या दिवशी 34.74 कोटींची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 337.58 कोटी रुपयांची कमाई केली होती. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube