Animal Movie: हैदराबादमध्ये ‘अ‍ॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

Animal Movie: हैदराबादमध्ये ‘अ‍ॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

Animal Movie: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये रणबीर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत होता. यामध्ये त्याची जोडी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna)आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केले आहे,

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली आणि सुपरस्टार महेश बाबू, बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल, निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना भेटून, ‘अ‍ॅनिमल’ बद्दलची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या अॅनिमलच्या प्रमोशनल इव्हेंटचा एक भाग असणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा देशभरातील चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे. या सिनेमातील कलाकार नक्कीच चित्रपटाची शोभा वाढवणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान रणबीरने बॉबीचे (Bobby Deol) तोंडभरून कौतुक केले आहे, बॉबीचा स्टाईल आयकॉन ठरतेय असल्याचे मत त्याने यावेळी केला आहे. चाहते सध्या ‘अ‍ॅनिमल’ ची सिनेमाची वाट पाहत आहेत, आणि रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल चाहते खूप उत्सुक झाल्याचे दिसत आहेत.

गेल्या काही दिवसापूर्वी रणबीर कपूरने या सिनेमासाठी 70 कोटी मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम त्याचा शेवटचा सिनेमा ‘तू झूठी मैं मक्कारपेक्षा खूप जास्त आहे. या सिनेमात त्याने लव्हर बॉयची भूमिका साकारली होती. या भूमिेकेसाठी त्याने 20-25 कोटी मानधन घेतले होते. अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूरचा हटके लूक भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना महागात पडले आहे. रणबीर कपूरचे मानधन 70 कोटी इतके आहे. त्याच्या तुलनेमध्ये इतर स्टारकास्टने कमी मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात कमी मानधन अनिल कपूरने घेतले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Tiger 3 Offer: भाईजान-कतरिनाच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट; ‘टायगर 3’च्या तिकिटावर बंपर ऑफर!

तसेच रश्मिकाला खूप कमी मानधन दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीला 4 कोटी रुपये मानधन दिले आहे. अ‍ॅनिमलसाठी रणबीर कपूरला बॉबी देओल पेक्षा 14 पट जास्त मानधन दिले आहे. बॉबी देओलला जवळपास 4-5 कोटी मानधन दिले आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube