मोठी बातमी, पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, मंत्रालयाला घेराव घालणार

Maratha Reservation : मराठा समाजासाठी आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 17 सप्टेंबरपासून

Maratha Reservation : मोठी बातमी, पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, मंत्रालयाला घेराव घालणार

Maratha Reservation : मोठी बातमी, पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, मंत्रालयाला घेराव घालणार

Maratha Reservation : मराठा समाजासाठी आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा अतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील (Pune) मराठा आंदोलक मुबंईत दाखल झाले असून आज रात्री आझाद मैदानावर ते ठिय्या करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे या आदोलकांच्या अवतीभोवती चेंबूर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुण्यातील मराठा आंदोलकांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज आंदोलक मुबंईत दाखल झाले आहे. त्यांनी या आंदोलनांला मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं नाव दिले आहे.

आज सकाळी हे आंदोलक खंडोबा चौकातून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. सरकारने मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावे तसेच मनोज जरांगे यांच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहावे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेल्या आश्वासन स्मरण करून देण्यास ही यात्रा काढण्यात आली आहे. रात्री 9 च्या सुमारास ही यात्रा चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमची तत्काळ भेट घ्यावी अशी मागणी मराठा आंदोलक करत आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 8 उच्च न्यायालयाला अखेर मिळाले सरन्यायाधीश 

तर दुसरीकडे वडगोद्री येते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी देखील उपोषण सुरू केला आहे. त्यामुळे जालन्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटीजवळ चोख बंदोबस्त ठेवला आहे.

लाडकी बहीण योजनेबद्दल खोटा प्रचार पण…, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Exit mobile version