Download App

‘काही दिवसांनी मनोज जरांगेच्या क्लिप बाहेर येणारच’; महिला साथीदाराकडून पोलखोल

Sangeeta Wankhede On Manoj Jarange Patil : पुढील काही दिवसांनी मनोज जरांगेच्या क्लिप बाहेर येणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या महिला साथीदार संगिता वानखेडे (Sangeeta wankhede) यांनी पोलखोल केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. अजय बारस्कर महाराजांनंतर आता संगिता वानखेडे यांच्याकडून मनोज जरांगे यांची पोलखोल करण्यात आली आहे. त्यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे.

‘वंचित’ अजून ‘मविआ’मध्ये नाही, ‘त्यांचं’ मिटल्यानंतरच आम्ही चर्चा करू’ : आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

संगिता वानखेडे म्हणाल्या, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतच्या अनेक क्लिपा आहेत. पुढील काही दिवसांतच त्या क्लिपा बाहेर येणार आहेत. ज्यावेळी क्लिपा बाहेर येतील ना तेव्हा मराठा बांधव मनोज जरांगेंना पळून पळून मारणार असल्याचं भाकीतच संगिता वानखेडेंनी केलं आहे. त्यामुळे आता राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

अजय बारस्कर महाराजांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी मनोज जरांगे यांनी बाईट दिली आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, यामध्ये आणखीन काही दहा पंधरा लोकं आहेत. म्हणजेच मनोज जरांगे यांचे विचार न पटलेले दहा ते पंधरा लोकं मनोज जरांगे यांच्यापासून फुटलेले आहेत, ते मनोज जरांगे यांना माहिती आहेत, पण आम्हाला माहित नाही, तेही समोर येणार असल्याचा दावा संगिता वानखेडेंनी केला आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याल १ लाखाहून अधिक पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रापर्यंत मराठा आंदोलनामध्ये मीही सहभागी होतेच. पण काही कारणास्तव मला घरी थांबवावं लागत होतं. त्यामुळे मी अंतरवली मुंबईला गेले नव्हते. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही मनोज जरांगे यांना पाठिंबा देत होतो. जर मी अंतरवलीमध्ये असते तर मनोज जरांगेला नागडा केला असता, मी अनेक चुकीच्या माणसांच्या वाट लावलेल्या आहेत, या शब्दांत संगिता वानखेडेंनी मनोज जरांगे यांना एक इशाराच दिला आहे.



जरांगेचं शेपूट लांबतच गेलं…

मागील अनेक वर्षांपासून संगिता वानखेडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलनात सक्रिय आहेत. याआधीही मराठा क्रांती मोर्चात त्यांचा सहभाग होता. आता मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनातही संगिता वानखेडे सक्रिय होत्या. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध करताच त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली होती. अखेर आता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेवरुन वानखेडे आक्षेप नोंदवला आहे. जेव्हा अंतरवली सराटीत हल्ला झाला त्यानंतर जरांगेंचं शेपूट लांबवत गेलं होतं. आधी मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी नंतर सरसकट मराठ्यांना नंतर सगेसोयरे म्हणजे तुमचं जे शेपूट आहे ते लांबवत चाललं. मनोज जरांगेंनी कधी कोणत्या सहकाऱ्याला विचारुन निर्णय घेतले आहेत. कोणता सहकारी असं म्हणत आहे त्याने पुढे यावं? असं खुलं आव्हानच वानखेडेंनी दिलं आहे.

follow us