माणुसकीला काळीमा! नराधमाचा स्वत:च्या नातीवर अत्याचार,घटनेने संताप

नराधम आजोबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात आलं

News Photo   2026 05 03T171024.515

माणुसकीला काळीमा! नराधमाचा स्वत:च्या नातीवर अत्याचार,घटनेने संताप

बीडच्या केज तालुक्यात माणुसकीला (Beed) काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अजोळी गेलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर नऱाम आजोबाने अत्याचार केला आहे. ही घटना केजमधील युसुफवडगाव पोलीस ठाणे परिसरात घडली होती.

या घटनेनं तालुका हादरून गेला आहे, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले आहे. बीडच्या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विवाहित तरुणी आपल्या माहेरी आली होती. ती माहेरी आली असता, त्या विवाहित तरुणीच्या वडिलांनी स्वत:च्याच तीन वर्षाच्या नातीवर अत्याचार केला.

दारुच्या नशेत वडिलांवर जीवघेणा हल्ला, बीड जिल्ह्यातील थरारक घटना

नराधम आजोबाने तिच्या गुप्तांगाला चुकीचा स्पर्श केल्याची घटना आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिमुकलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. या प्रकरणात आईने युसुफवडगाव पोलीस ठाणे गाठले आणि नराधम आजोबावर पोक्सो अंतर्गत 4,6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील गुन्हा दाखल होताच, पिंक पथताने पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी 1 मे 2026 रोजी नराधम आजोबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात आलं आहे.

Exit mobile version