Download App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गदारोळ, आंदोलकाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले

Chhatrapati Sambhajinagar : 14 फेब्रुवारीला काही हिंदुत्वावादी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) आवारात धुडगूस घातला होता. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विविध दलित संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तत्काळ ताब्यात घेऊन कारवाईसाठी त्याला पोलीस ठाण्यात नेले आहे.

व्हॅलेन्टाईन डेच्या (Valentine Day) दिवशी विद्यापीठात भगवे उपरणे घातलेले काही तरुण घुसले होते. 30-35 जणांचे टोळके हे बजरंग दलाचे होते. त्यांनी तोंडाला भगवे वस्त्र बांधले होते आणि हातात लाठ्या-काठ्या घेऊन मुलं-मुली एकत्र बसलेले दिसले तर त्यांना धमकावत होते. त्यांच्या दादागिरीविरोधात विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या दालनासमोर आंबेडकर चळवळ आणि डाव्या चळवळीतील संघटनांचे आंदोलन केले होते. परंतु आंदोलन करणाऱ्यांविरोधातच गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. कुलगुरु आणि आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थनी संघटनांमधील संघर्ष तीव्र झाला आहे.

‘जरांगेंनी कितीही आरोप केले तरी मराठा समाज माझ्या मागे उभा’ : फडणवीसांनी सांगितलं कारण

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भीम टोला आंदोलनाला वेगळं वळण लागलं आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी 11 वाजेपासून दलित संघटनेतर्फे भिमटोला नावाचे आंदोलन सुरु होते.

Pune News : राजकारणात खळबळ! मनसेचे नाराज वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला

मात्र दोन तास उलटूनही विद्यापीठ प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नव्हती. त्यानंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या सचिन निकमने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रतत्न केला.

सावेडीकरांचा मनोज जरांगेंना भक्कम पाठिंबा; अजय बारस्करांचा केला निषेध

follow us