औरंगबाद : राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाकयुद्ध चांगलचं रंगलंय. काल अधिवेशनानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्यात आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंदक्रांत खैरेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अमित शहा सॅटेलाइट नियंत्रित करून ईव्हीएम मशीन हॅक करत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलीय. ईव्हीएम हॅक करण्यासाठी अमित शहा आणि भाजपच्या लोकांनी माणसं कामाला ठेवल्याचंही त्यांनी यावेळी आरोप केला आहे.
40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका
यासंदर्भातील माहिती खरी असून ईव्हीएम हॅक करणाऱ्यांमधील एकाने मला ही गोपनीय माहिती दिली असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे. चंद्रकांत खैरे शिवगर्जना अभियानाच्या सभेत गडचिरोलीतून बोलत होते.
गाडीत ड्रग्स टाकल्याशिवाय मोका लावता येणार नाही; ‘त्या’ कटाचा गिरीश महाजनांनी केला धक्कादायक खुलासा
पुढे बोलताना खैरे म्हणाले, देशातल्या इतर राज्यांमध्येही विरोधी पक्षांना संपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून सीबीआय, आयकर विभाग, सर्वोच्च न्यायालय, ईडी अशा स्वायत्त संस्थांचा गैरवापर होत आहे.
एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव दिलं असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाहीत बहुमताला महत्व असून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नसल्याचा टोला ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावला.
विधानसभेत खडाजंगी! भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांना धमकावले; फडणवीसांचा आरोप
केंद्रीय मंत्री अमित शहांकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याने आता राज्यातील आगामी निवडणूका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे.
दरम्यान, खैरेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं बोललं जातंय. खैरे यांच्याकडून अनेकदा सत्ताधारी सरकारवर गंभीर स्वरुपात आरोप करण्यात येत असून त्यांच्या या आरोपाला शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.