खूप मोठा डाव… खूप मोठी साखळी; त्या नेत्याचे नाव जाहीर करणार; मनोज जरांगे मोठा बॉम्ब फोडणार

Manoj Jarange: Manoj Jarange: ती खूप मोठी साखळी आहे. त्या नेत्याचे नाव उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

A Very Big Plot And Conspiracy To Kill Me, A Very Big Chain, Manoj Jarange

A Very Big Plot And Conspiracy To Kill Me, A Very Big Chain, Manoj Jarange

Manoj Jarange: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोघांना जालना (Jalna Police) पोलिसांनी अटक केलीय. त्यातील एक जण मनोज जरांगे यांचा जुना सहकारी असल्याचे समोर येत आहे. माझ्या हत्येचा खूप मोठा डाव आणि कट होता. ती खूप मोठी साखळी आहे. त्या नेत्याचे नाव उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

कानावर आलं तेव्हा स्पष्ट सूचना दिल्या होत्या पण… जमीन खरेदी अजित पवारांना खटकलं पण पार्थ यांनी रेटलं

याबाबत जरांगे म्हणाले की, त्यात एक माझा सहकारी आहे. बाकीचे काही माहिती नाही. परंतु करून घेणारा कोण आहे. त्याबाबत मी उद्याच नाव जाहीर करणार आहे. ती खूप मोठी साखळी असून, हे गंभीर प्रकरण आहे. हा खूप मोठा डाव आणि कट आहे. या मागे एक-दोन नाहीतर ती खूप मोठी साखळी असल्याचा दावा जरांगे यांनी केलाय.
(A very big plot and conspiracy to kill me, a very big chain, Manoj Jarange)


काहीतरी डाग लावण्यासाठी हे कुटाणे

सच्चा मराठ्यांसाठी मी काम केले आहे. काहीतरी डाग लावण्यासाठी हे कुटाणे करत आहेत. यांना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. हे नियतीला मान्य नाही. चांगले काम करणाऱ्यांना बदनाम करायचे आहे. खोटे नाटे आरोप करायचे आहेत. काही नाही होत तर खून, घातपात करण्याचा डाव होता, असे जरांगे म्हणाले. जालन्याचे एसपी लक्ष घालून त्या नेत्यापर्यंत जातील. त्याबाबतचे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ आहेत. तशा बैठका झाल्या आहेत. उद्या पत्रकार परिषदेत सगळे सांगतो. पोलिस प्रशासन अॅक्टिव्ह आहे. तो मोठा नेता आहे.


LetsUpp Exclusive: पार्थ पवार यांचा दोन हजार कोटींच्या सरकारी जमिनीवरच डल्ला, मुद्रांक माफी तर नाटक…..

नाहीतर आयुष्यभर जेलमध्ये सडतील-जरांगे
कोणत्या नेत्याचे एेकूण जरांगेवर पाटील आरोप करत आहेत. त्यांचा संसार बरबाद होत आहे. राजकीय नेत्यांनी गोळा केलेल्या टीम उद्धवस्त होईल किंवा जेलमध्ये सडतील. त्यांनी शहाणे व्हावे. सुखाचे भाकर आणि सुखाचे संसार मोठा करावा. त्यांच्या अमिषापोटी दहा पाच रुपयांसाठी काही करायला जाल, तर आयुष्याभर जेलमधून सडून राहताल, पुढच्या टीम, टोळ्यांनी सुधारावे. माझ्या वाटेला जाऊ नाही, असा इशाराही जरांगे यांनी केलाय.


देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घ्यालावे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यात बारकाईने लक्ष घ्यालावे. याला किती वेळा माफ करणार आहात. शेवटच्या कडीपर्यंत जा. त्याला अटक करा किंवा चौकशीला घ्या. त्यांना आम्ही सांगितले आहे. पुढचं मुख्यमंत्र्यांनी बघावे असे जरांगे यांनी सांगितले.

Exit mobile version