Download App

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ; युवकांच्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू

युवकांच्या दोन गटांत सहा महिन्यांपासून वाद आहे. गुरुवारी सायंकाळीही वाद झाल्यानंतर दोन्हीकडील युवकांची आपसात

  • Written By: Last Updated:

Two People Murder In Vaijapur : वैजापूर तालुक्यात खंडाळा येथे युवकांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एका गटाने तिघांना चाकूने भोसकले. यात दुसऱ्या गटातील २४ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले. मोईन मुक्तार शहा (वय २४) असं खून झालेल्याचं नाव आहे. (Murder) शेख अबरार आरीफ शेख ( वय २३) व शोएब असीम पठाण (वय २३, तिघे रा. खंडाळा) हे गंभीर जखमी आहेत. त्‍यांच्यावर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Buldhana News : दोन गटांत राडा; भाजपा युवा तालुका अध्यक्षासह 6 जण गंभीर जखमी

या घटनेनंतर खंडाळ्यासह वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयात तोडफोड केली, सोबतच खंडाळा, भायगावमध्ये प्रत्‍येकी एक अशी दोन दुकाने पेटवून दिली. दोन गटांतील वादाला जातीय वळण देण्याचा आणि दंगल पेटविण्याचा प्रयत्‍न होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्‍यामुळे ग्रामस्थही संतापले आहेत.

नक्की काय झालं?

युवकांच्या दोन गटांत सहा महिन्यांपासून वाद आहे. गुरुवारी सायंकाळीही वाद झाल्यानंतर दोन्हीकडील युवकांची आपसात हाणामारी सुरू झाली. मोईन मुक्तार शहा, शेख अबरार आरीफ, शोएब असीम पठाण या तिघांना काहींनी चाकूने भोसकले. तिघांनाही वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मोईनचा मृत्‍यू झाल्याने संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत आतील कागदपत्रांची फेकझोक केली.

अबरार आणि शोएबला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैजापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सहकाऱ्यांसह रुग्णालयात धाव घेतली. खंडाळा आणि उपजिल्हा रुग्णालयात बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, खंडाळा गावातील एकाच्या दुकानातील साहित्य बाहेर काढून संतप्त जमावाने पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे, सोबतच भायगाव येथील एका सलूनच्या दुकानातील साहित्यही जमावाने बाहेर फेकून पेटवून दिले.

या दोन्ही घटनांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खंडाळ्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी गौरव राजू अनर्थ (रा. भायगाव), अक्षय सुरेश पवार, शेखर लक्ष्मण नन्‍नावरे, नंदू पोपट जानराव ( सर्व रा. खंडाळा) आणि अन्य तिघे अशा ७ जणांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी आज, १३ जूनला पहाटे दोनला गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी अटकही केली आहे.

follow us

संबंधित बातम्या