Assembly Election 2024 : भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा (Assembly Election) करण्यात आलीयं. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरु असून बीडच्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघातलं (Aashti-Patoda-Shirur Assembly Constituency) वातावरणत चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू रामभाऊ खाडे मैदानात उतरणार असल्याने विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेंना निवडणूक जड जाणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. राम खाडे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली असून शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केलीयं. त्यामुळे या मतदारसंघातून राम खाडे यांनाच उमेदवार मिळणार असल्याची चर्चा रंगू लागलीयं.
मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे वाघ होत नाही; ‘टायगर जिंदा है’ म्हणणाऱ्या विखेंना खोचक प्रत्युत्तर
मागील अनेक वर्षांपासून रामभाऊ खाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असून मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम ते प्राधान्याने करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. सोनावणे यांच्या विजयात खाडे यांचा सिंहाचा वाटा असून खाडे यांच्या जनसंपर्कामुळे आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघातून सोनावणे यांना मोठं मताधिक्य मिळालंय. एकूणच राम खाडे यांच्या कामाची पद्धत आणि जनसंपर्क पाहता खाडे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याची बिश्नोई गँगने कशी केली निवड?, वरातीतल्या गोळीबाराची खतरनाक कहाणी
मतदारसंघात राम खाडे यांना भलतीच पसंती…
काही दिवसांपासून राम खाडे यांचा मतदारसंघात जनसंपर्क दौरा सुरु आहे. दौऱ्यादरम्यान, खाडे वाड्या-वस्त्यांवर दाखल होत नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीमधून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम खाडे यांच्याकडून केलं जात आहे. या दौऱ्यामुळे खुद्द नागरिकांकडूनच खाडे यांना भेटीसाठीचं निमंत्रण देण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दौऱ्यादरम्यान, राम खाडे यांना जनसामान्य नागरिकांमधून भलतीच पसंती मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे.
आमदार आजबेंना निवडणूक जड जाणार?
आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघाची जागा अजित पवार गटाला सुटल्यास महायुतीकडून आजबे हेच दावेदार असणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून राम खाडे यांचं नावं चर्चेत आहे. तर भाजपकडून माजी आमदार सुरेश धस यांच्या नावाचा डंका आहे. त्यामुळे महायुतीकडून कोणताही उमेदवार असो, राम खाडे यांची विकासकामे, जनसंपर्क, पसंती पाहता निवडणुकीत ते प्रतिस्पर्धी उमेदवाराला निवडणूक जड जाईल एवढं मात्र नक्की.
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला धूळ चारण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनेक मतदारसंघात डाव टाकत असल्याचं चित्र आहे. अशातच आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघातून विश्वासू सहकारी रामभाऊ खाडे हे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत, मतदारसंघातही त्यांना मिळत असलेली पसंती, यासोबतच जनसंपर्क पाहता शरद पवारांकडून राम खाडे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.