काय सांगता?… 5 कोटींच्या खंडणीसाठी तुकाराम मुंडेचं अपहरण, बीडमध्ये घडला थरार

तुकाराम मुंडे यांची सुटका झाली असून ते सुखरूप आहेत. आरोपींनी वापरलेले वाहन आणि त्यांच्या ठावठिकाण्याबाबत कसून चौकशी सुरू आहे. 

Tukaram Munde 1

काय सांगता?... 5 कोटींच्या खंडणीसाठी तुकाराम मुंडेचं अपहरण, बीडमध्ये घडला थरार

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ (Beed) येथून एका कंत्राटदाराचे 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची थरारक घटना समोर आली आहे. पोलिसांचा वाढता दबाब आणि चोख तपास यामुळे अखेर अपहरणकर्त्यांन व्यक्तीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जवळील धोत्रा परिसरात सोडून पळ काढला. तुकाराम मुंडे असे सुखरूप सुटका झालेल्या कंत्राटदाराचे नाव असून, या संपूर्ण प्रकरणाची बीड आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

तुकाराम मुंडे (परळी वैजनाथ, जि. बीड) हे परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे 4 जून 2026 रोजी दुपारी आपले काम आटोपून ते कारने घरी परतत होते. याच दरम्यान, पाळत ठेवून असलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांचं जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात अपहरण केले आणि तेथून पळ काढला. मुंडे वेळेत घरी न पोहोचल्याने आणि त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

तुकाराम मुंढेंच्या रडारवर वडापाव व्यावसायिक; वर्तमानपत्रातील पॅकिंगवर एफएसएसएआयची कडक भूमिका

तुकाराम मुंडे यांचे अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मुंडे यांच्या सुटकेच्या बदल्यात आरोपींनी तब्बल 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. इतक्या मोठ्या रक्कमेची मागणी झाल्याचे समजताच मुंडे यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

प्लान कसा फसला?

घटनेचे गांभीर्य ओळखून बीड पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवली. बीड पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक (LCB) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांचे जाळे चहुबाजूंनी पसरत असल्याचे आणि आपला माग काढला गेल्याचे अपहरणकर्त्यांच्या लक्षात आले.

पोलिस कोणत्याही क्षणी आपल्या मुसक्या आवळणार, या भीतीने अपहरणकर्ते पुरते घाबरले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी आपला 5 कोटींचा प्लॅन गुंडाळला. त्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा गावाजवळील एका सुनसान रस्त्यावर तुकाराम मुंडे यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना गाडीतून उतरवले आणि तिथून पळ काढला. तुकाराम मुंडे यांची सुटका झाली असून ते सुखरूप आहेत. आरोपींनी वापरलेले वाहन आणि त्यांच्या ठावठिकाण्याबाबत कसून चौकशी सुरू आहे.

Exit mobile version