Download App

गायरान जमिनीवरून अडचणीत आलेल्या सत्तारांवर मुलींमुळे नवे संकट

  • Written By: Last Updated:

औरंगाबादः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरले आहे. त्यावरून ते अडचणीत सापडले आहेत. त्यात आता मुलीच्या टीईटी घोटाळ्याप्रकरणात सत्तारांवर नवीन संकट आले आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणात माहिती अधिकारात सत्तारांच्या मुलींबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नावेही आलेली आहेत. त्यात आता माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारामध्ये सत्ताराच्या मुलींबाबत माहिती मागविली होती. त्यात सत्तारांची मुलगी हिना कौसर हिच्याकडे टीईटी प्रमाणपत्र नसल्याचे उघडकीस आले. तर तिच्या आधार कार्ड, पॅनकार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. त्यानंतरही त्यांना सेवेत रुजू करण्यात आले. त्यांच्या दुसऱ्या मुलीची माहिती उपलब्ध नसल्याचे पत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलाय.

शिक्षक भरतीवर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. त्यानंतर सत्तार यांच्या शेख हिना कौसर अब्दुल सत्तार या मुलीची १६ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षणसेवक म्हणून कायम नेमणूक केली गेली. नेमणूक करताना शिक्षणसेवक म्हणून कायम करण्यासाठी जे टीईटी प्रमाणपत्र बंधनकारक असते. परंतु सत्तारांच्या मुलीचे प्रमाणपत्र सरकारकडे नाही, असे सांगण्यात आल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

आधार कार्ड, पॅनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्म तारखांचा वेगवेगळा उल्लेख आढळून येतेय. सोबत दुसऱ्या मुलीची माहितीच त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करुन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुन तर हा शिक्षक घोटाळा झाला नाही ना याची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणीही यादव यांनी केली आहे.

Tags

follow us