परभणी जिल्ह्यातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. (Parbhani) मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभामंडप अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत 7 जण मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 32 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली 30 ते 40 जण दबल्याची माहिती मिळत आहे.
प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आली आहे.पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व यंत्रणा घटनास्थळी पाठवली आहे. आज शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येत असतात. अनेक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
यशवाडी येथील हनुमान मंदिर हे अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान मानले जाते. केवळ परभणीच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज शनिवारचा दिवस असल्याने मंदिरात दर्शनासाठी नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या या सभामंडपाचे काम सध्या प्रगतीपथावर होते. दुपारच्या सुमारास अचानक हा नव्याने बांधण्यात येत असलेला सभामंडप कोसळला.
याला गद्दारीच म्हणतात.. बंडू जाधवने मतदारांचा अपमान केला; मी पुन्हा परभणी लढणार…
मंडप कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ आणि पळापळ निर्माण झाली. या दुर्घटनेच्या वेळी दर्शनासाठी आलेले 30 ते 40 भाविक मलब्याखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या असून, वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तात्काळ हालचाली सुरू झाल्या आहेत. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तातडीने सर्व आवश्यक मदत यंत्रणा आणि क्रेन घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
