Download App

मराठवाड्यात शेतकऱ्यांची तुरीला पसंती; तब्बल ३ लाख ४३ हजार हेक्टर झाली पेरणी

जिल्ह्याच्या तूर पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढे जाऊन तुरीची पेरणी झाली आहे.

Marathwada Agriculture : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात (Agriculture) सर्वसाधारण ४ लाख ४५ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७६.९७ टक्के म्हणजे तीन लाख ४३ हजार २९४.६० हेक्टरवर तुरीची लागवड व पेरणी झाली आहे.

यामध्ये पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण एक लाख ४१ हजार ३९७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत एक लाख २६ हजार १५७ हेक्टर म्हणजे सुमारे ८९.२२ टक्के क्षेत्रासह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

नांदेडात सरकारी आदेशाची होळी, सांगलीत मोजणीच बंद; शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

यामध्ये सर्वसाधारण तीन लाख ४ हजार ५९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष पेरणी झालेल्या २ लाख १७ हजार १३६ हेक्टर म्हणजे सुमारे ७१.२९ टक्के क्षेत्रावरील पेरणी झालेल्या तुरीचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी करताना निखळ तूर लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र अनेक भागात पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्याच्या तूर पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढे जाऊन तुरीची पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२७.०४ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०७.४९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात ८३.९८ टक्के, बीडमध्ये ७३.४१ टक्के, लातूरमध्ये ७०.४४ टक्के, धाराशिव ५८.५६ टक्के, नांदेड ७१.७६ टक्के तर परभणी ५१.२३ टक्के क्षेत्रावरच तुरीची पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय तुरीची पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण प्रत्यक्ष पेरणी

छत्रपती संभाजीनगर ३११०९.७१ ३९५२०

जालना ५३६६३.८० ४५०६८

बीड ५६६२३.७१ ४१५६९

लातूर ९१७८६.२३ ६४६५७

धाराशिव ५५६०८.०६ ३२५६३

नांदेड ७०२२३.२० ५०३९०

परभणी ४२६०२.७८ ४१८२४

हिंगोली ४४३७८.१० ४७७०२.८०

follow us