Download App

गड आला पण सिंह गेला; विधानसभेला फिनिक्स भरारी घेऊ, अंबादास दानवे, खैरेंची आढावा बैठक

लोकसभेला जे झालं ते झालं. आता विधानसभेला फिनीक्स पक्षासारखी भरारी घेऊ असं म्हणत अंबादास दानवे यांनी विरोधकांना कानपिचक्याही काढल्या.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीत ‘गड आला पण सिंह गेला’ असा अनुभव उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यात आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने मराठवाड्यातील 8 जागांपैकी 7 जागांवर विजय मिळवला. (Ambadas Danve) मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये पराभव वाट्याला आला. (Chandrakant Khaire) परंतु, आता विधानसभेला हे चित्र बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सात ठिकाणी विजय  ठाकरे गटात धुसफूस, सर्व मीच करायचं होतं का? खैरेंनी दानवेंवर फोडलं पराभवाचं खापर

तस पाहिलं तर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेच्या दुफळीनंतरही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मराठवाड्यात दमदार कामगिरी दाखवली. 8 लोकसभा जागांपैकी सात लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने विजयी पताका फडकावली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेला छत्रपती संभाजीनगरची जागा नक्की येणार हा विश्वास होता. मात्र,तीच हातची जागा त्यांना गमवावी लागली. त्यानंतर आता या पराभवाचं चिंतन-मंथन झालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र पालटण्याचा प्रयत्न होणार आहे.

विधानसभेत करिष्मा करून दाखवा

छत्रपती संभाजीनगर लोकसभेत ठाकरे गटाचा पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाकडून संभाजीनगर येथे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे, नेते अंबादास दानवे, संभाजीनगरचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उपस्थित होते. शिवसेना पक्षाला मानणार मतदान आपल्याला लोकसभेत झालं इतर कोणत मतदान झालं नाही, मुस्लिम दलित मतदान संभाजीनगर लोकसभेत झालं नाही. येणाऱ्या विधानसभेत बाकी मतदान घ्या आणि विधानसभेत करिष्मा करून दाखवा असं आवाहन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थितांना केलं आहे.

भरारी घ्यावी लागेल

जे झालं ते सोडून द्या. जी तुटकी फुटकी साधन होती त्यातून प्रचार आपण केला. केवळ आपल्या पक्षाला मानणार मतदान आपल्याला पडलेलं आहे. शिवसेनेच हक्काच मतदान पडलं आहे, आपण म्हणतो मुसलमान, दलित मात्र, मी कोणत्या जातीपातीवर बोलणार नाही. यामध्ये आपला पराभव झाला पण आपला विश्वास मजबूत ठेवण्याची आवश्यकता आहे. या मोठ्या पराभवातून फिनिक्स सारखी आपल्याला भरारी घ्यावी लागेल असंही अंबादास दानवे यावेळी म्हणाले आहेत.

काही लोक तोंडावर गोड बोलतात   वसीम चिकनाला पोलिसांकडून अटक; बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड

छत्रपती संभाजीनगर येथील ही विधानसभा आपण लढली नव्हती. पण इथले उमेदवार हे शिवसेनेच्या मदतीने निवडून आलेत हे खरं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला इथं लढायचं आहे. घोसाळकर यांनी इच्छुक उमेदवारांची नावं घेतली. काही लोक तोंडावर गोड बोलतात. पक्षाचा उमेदवार जो देईल तो आम्ही निवडून देऊ असं तस काही बोलत असतात, केवळ एका बैठकीत उमेदवार ठरत नाही तर उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या यंत्रणामार्फत डेटा घेतात नंतर प्लॅन ठरला जातो, असा चिमटा त्यांनी गोड बोलणाऱ्या नेत्यांना काढला.

follow us

वेब स्टोरीज