Anjali Damania on Namdev Shastri Maharaj : बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्याचं राजकारण तापलं आहे. या हत्येमागे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांच्यासह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जात आहे. यावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.
त्याबद्दल अंजली दामनिया यांनी ट्विट करत शास्त्रींना सवाल केला आहे. तसेच कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत भगवान गडावर पाठवत असल्याचं म्हटलं आहे.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट
या ट्विटमध्ये दमानिया म्हणाल्या की, माननीय नामदेव शास्त्रींजी, आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं. आपण म्हणालात आपण धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिलेत, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडाकडून धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला. आम्ही स्व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो, त्यांना भेटल्यावर खूप अवस्थ वटलं. काय दोष होता ह्या भाबड्या जिवांचा? का वडलांचे छत हिरावून घेतलं गेलं यांचं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तरीही गुंतवणूकदार नाराज; ‘हे’ आहे कारण
आम्हीत् यांचे पुरावे पाहिले. नंतर आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार शोधले, त्यांचे balance sheet पाहिले आणि केलेल्या दहशतीचे पुरावे पाहिले, बंदुकांचे फोटो पाहिले, वीडियो पाहिले. मी एसपी ना, ADG, DG, मुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटले आणि मुंबई हाई कोर्ट च्या चीफ जस्टिस यांना पुरावे सादर केले.
https://x.com/anjali_damania/status/1885646989204795799
दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत त्यांच्या बरोबर मी हे पाठवत आहे. कृपया ते पहावे ही विनंती आणि…वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःख देखील आपण पाहावे ही नम्र विनंती.” असं दमानिया म्हणाल्या.
काय म्हणाले महंत नामदेव शास्त्री?
‘धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी माझी चर्चा झाली. सर्व समजून घेतल्यानंतर असं जाणवलं की तो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आणि सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे.’
कोपरगाव मतदार संघातील 3 देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर; आमदार आशुतोष काळे
‘मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात आहे. खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत. मुंडेंची पार्श्वभूमी ती नाही. आज मीडियाद्वारे जातीवाद पसरवला जात आहे. मात्र हा विषय किती ताणायचा हा ज्याने त्याने ठरवावं. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे’, असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले.
‘समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही. भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे’, असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भीतीची पद्धत आहे, असं शास्त्री म्हणाले.