सलाईनमधून विष देण्याचा, एन्काऊंटर करण्याचा डाव; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केला आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा आणि एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्ही माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या. तुम्हाला कायमचा आयुष्यातून […]

..तर विधानसभेला 288 उमेदवार उभे करणार; उपोषण सुरू करताच जरांगेंचा सरकारला इशारा

..तर विधानसभेला 288 उमेदवार उभे करणार; उपोषण सुरू करताच जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केला आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा आणि एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्ही माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या. तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेन, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

माझा बळी घ्यायचा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, सागर बंगल्यावर मला गोळ्या घाला, पण खोटे आरोप सहन करणार नाही. यावेळी फडणवीस तुमचा सुफडा साफ होणार आहे. वाटलं तर माझा बळी घ्या पण खोटे आरोप करु नका, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

जो पहिल्यापासून दिशाहीन, तो पुढची दिशा काय ठरणार?, भुजबळांचा जरांगेंवर टोला

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केलेले आहे. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजासमोर त्यांनी भाष्य केलं. यावेळी जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मराठा बांधवांना झुगारुन जरांगे फडणवीसांवर धावले; ‘सागर’ बंगल्याकडे मनोज जरांगे…

मराठा आंदोलन संपवण्याचा फडणवीसांचा डाव आहे. यामध्ये शिदेंचे काही लोक आहेत तसेच अजित पवारांचेही दोन आमदार यामध्ये सामील आहेत. ओबीसीतून आरक्षण देत नाहीत, सगेसोयऱ्यातून आरक्षण देत नाही, मराठ्यांवर 10 टक्के आरक्षण लादलं आहे पण मी त्यांचं ऐकत नाही. त्यासाठी मला संपवलं पाहिजे नाहीतर त्याचा गेम तरी केला पाहिजे, नसता त्याला बदनाम केलं पाहिजे, नाहीतर उपोषणात तरी मरु द्यावं लागेल. सलाईनमधून विष देऊन तरी मारलं पाहिजे, असा त्यांचा विचार आहे. म्हणून मी सलाईन बंद केली आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

Exit mobile version