जो पहिल्यापासून दिशाहीन, तो पुढची दिशा काय ठरवणार?, भुजबळांचा जरांगेंवर टोला
Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये आज निर्णायक बैठक होणार आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी पुन्हा एकदा मनोज जरागेंवर जोरदार टीका केली. जो पहिल्यापासून दिशाहीन आहे, तो पुढची दिशा काय ठरवेल, असं भुजबळ म्हणाले.
मराठा बांधवांना झुगारुन जरांगे फडणवीसांवर धावले; ‘सागर’ बंगल्याकडे मनोज जरांगे…
छगन भुजबळांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भुजबळांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, जो पहिल्यापासून दिशाहीन आहे तो पुढची दिशा काय ठरवणार? वारंवार मागण्या वाढवल्या जातात, त्याला न समजणारे विषय, न समजणारे अध्यादेश, त्याचा अर्थ, वेळोवेळी उधाळलेला गुलाल हे पाहता सुरूवातीला निजाम काळातील कुणबी नोंदी, आधी मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्रे द्या, मग महाराष्ट्रातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे द्या, मग ते वाढत गेले. त्यामुळं लोकसुध्दा आता म्हणतायेत, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलंय, मग आंदोलनाची गरज काय? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी केली.
Prajakta Mali : गुलाबो… गुलाबी साडीत प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज
भुजबळ पुढं म्हणाले की, रोज उठलं की आंदोलन, आंदोलन… शेवटी जे आंदोलन करतात, त्यांनाही रोज घरचे काम, पोटपाणी असतं की नाही. त्यामुळं कदाचित लोक कंटाळले असतील. आता त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक बोलू लागलेत. लोकांच्या लक्षात आलंय की, या गृहस्थाचा अभ्यास नाही. उगीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून कुणाला शिव्या द्यायच्या, संत तुकाराम यांच्याबाबतीत चुकीचे बोलणे. मुख्यमंत्र्यासंह सर्वांना वाईट बोलणए या सर्व गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात. शेवटी महाराष्ट्र पहिल्यापासून सुसंस्कृत आहे. काही काळासाठी तुम्ही वादळ उठवू शकता, पण, त्यातील सत्यता बाहेर आल्यानंतर ते वादळ तितक्याच वेगाने संपेल, असं भुजबळ म्हणाले.
यावेळी भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद आहे, पण निवडणुकीत तुतारी किती वाजेल हे सांगता येत नाही. नवीन चिन्ह मिळते, तेव्हा अशा प्रकारे समारंभा केला जातो. जेणेकरून त्याचा प्रचार, प्रसार होईल. माध्यमांमध्ये ते दाखवले, त्यातून जाहिरातबाजी झाली, असा टोला भुजबळांनी लगावला.