Chhagan Bhujbal : “लहान पक्षही मोठे होतात” छगन भुजबळांचा बावनकुळेंना खोचक टोला

Chhagan Bhujbal : “लहान पक्षही मोठे होतात” छगन भुजबळांचा बावनकुळेंना खोचक टोला

Chhagan Bhujbal : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात येत आहेत. आपापल्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. तर सत्ताधारी गटातील नेतेही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही भाष्य केले आहे.

मंत्री भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले, भाषण करताना असं बोललं जातं. पण तसं बोलू नये. लोकशाहीत प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मुभा आहे. सुरुवातीला कधी कधी लहान असणारे पक्ष मोठे सुद्धा होतात. आप किती लहान पक्ष होता पण आता मोठा झाला आहे.

Chhagan Bhujbal : या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद पण निवडणुकीत तुतारी किती वाजेल सांगता नाही; भुजबळांचा टोला

यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. मनोज जरांगे पाटील आज पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत असे विचारले असता ते म्हणाले, की जो पहिल्यापासूनच दिशाहीन आहे तो पुढील दिशा काय ठरवणार. त्याला दिशा तर कळाली पाहिजे की योग्य दिशा कोणती आहे, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

निवडणुकीमध्ये ही तुतारी किती वाजेल याबद्दल मी काही सांगू शकत नाही. या वयामध्ये आणि शारीरिक अडचणी असताना सुद्धा शरद पवार रायगडावर गेले. हे कौतुकास्पद आहे. ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारचे चिन्ह वगैरे मिळते. त्यावेळेस असा समारंभ केला जातो. तुतारी चिन्हाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ते रायगडावर गेले होते.

..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल 

फक्त एकच पक्ष राहिल तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्ष संपवून टाकू अशी भाजपची भाषा होती. पण, त्याच नड्डांना (JP Nadda) आता लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. लहान पक्षांना सोबत घेत पुन्हा एनडीएची उभारणी करावी लागत आहे. देशातील लोकशाही नष्ट करण्याता भाजपाचा प्रयत्न आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज