Download App

Aurangabad : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी CM शिंदेंची ‘सुभेदारी’ 32 हजारांचा सुट अन् 300 गाड्या

  • Written By: Last Updated:

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार आहेत त्याचे भाडे 32 हजार रूपये असून, या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला आहे. याशिवाय मंत्री, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या दिमतीला 300 गाड्यांचा ताफा असणार आहे. (Aurangabad Cabinet Meeting)

ठाकरे गटाला धक्का! आमदार वायकरांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

यापूर्वीदेखील मराठावाड्यात मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण तर, सध्याच्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी अशा बैठकीदरम्यान सरकारी विश्रामगृह असलेल्या सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये राहण्यास पसंती दर्शवली होती. मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अलिशान तयारी करण्यात आल्याचे पहायला मिळत आहे.

कसा असणार CM शिंदे अन् मंत्र्यांचा थाट

औरंगाबादमध्ये पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरातील पंचतारांकीत हॉटेल रामा इंटरनॅश्नलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांसाठी 30 रूम बुक करण्यात आल्या आहेत. याशिवाय दुसरे फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताज हॉटेलमध्ये सर्व सचिवांसाठी 40 रूम्स बुक करण्यात आल्या असून, उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकाऱ्यांसाठी अमरप्रीत हॉटेलमधील 70 तर, अजंता अॅम्बेसेडरमध्ये 40 रूम बुक करण्यात आल्या आहेत.

Ajit Pawar : अजितदादाही होतात ट्रोल! स्वतःच सांगितलं नेमकं काय घडलं?

त्याशिवाय सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांसाठी महसूल प्रबोधिनी आणि पाटीदार भवन येथील 100 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. प्रशासनातील इतर अधिकारी वर्गासाठी वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे येथे 20 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत.

मंत्री अन् अधिकाऱ्यांसाठी 300 गाड्यांचा ताफा

अलिशान हॉटेलमधील निवासी व्यवस्थेसोबतच नेते मंडळी, सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या जाण्या येण्यासाठी 300 गाड्यांचा ताफा बुक करण्यात आला आहे. या सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना ने-आण करण्यासाठी नाशिक आणि औरंगाबाद शहरातील 150 गाड्या भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

काश्मीरात रक्ताचे सडे, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण; BJP च्या सेलिब्रेशनवर ठाकरे गटाचा घणाघात

जेवणाच्या एका थाळीसाठी मोजणार इतके हजार

फाईव्ह स्टार हॉटेल, जा-ये करण्यासाठी 300 गाड्यांचा ताफा याशिवाय मंत्रिमंडळातील सर्वांच्या जेवणासाठी नम्रता कॅटर्सला कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार मोजले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us