Download App

बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; धनंजय मुंडेंची मागणी…

बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या मोर्चातून केलीयं.

Mla Dhananjay Munde : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नसल्याची घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलीयं. राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू केलंय. या गॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी भूमिका मुंडे यांनी घेतलीयं. बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्तानचा जळफळाट; टीम इंडियाची केली तक्रार

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून करुन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं. हा बंजारा समाज तेलंगणात, राजस्थानात आणि देशभरात अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या बाबतीत विचार करेल, तसा प्रयत्न मी करणार. हा माझा वैयक्तिक लढा असल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलंय.

समस्यांचं रुपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवं; मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे. त्यानुसार आता आधीचे एसटी आणि नव्याने येऊ घातलेले एसटी यांचा मेळ घालावा, त्याचा अभ्यास करावा. त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का? हे दोन्ही समाज एकच आहेत असंही धनंजय मुंडे म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदही राजकीय आखाड्यात? बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करणार

माझ्यासारखा नशिबवान मीच आहे. मी आज मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं. मंत्री नाही म्हणून येता आलं. आज महाराष्ट्रातल्या मराठा, धनगर आणि इतर वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासोबत आता बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतही मला उभा राहता येतं, त्यामुळे मी नशिबवान आहे. प्रत्येक मोर्चामध्ये मी तुमच्यासोबत आहे. बंजारा समाजाला जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

follow us