Download App

Beed Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

  • Written By: Last Updated:

Beed Accident : बीड जिल्ह्यामध्ये (Beed Accident) भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे भाविक अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून तुळजापूरला जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Deepak Kesarkar : ‘आम्ही कधीच एकमेकांवर व्यक्तिगत टीका केली नाही’

हे भाविक कारणे देवदर्शनाला जात असताना बीड जिल्ह्यातील आष्टी येथील पोखरी या गावाजवळ कारच्या चालकाचे नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार थेट झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये चालक रुपेश बबन भेंडे आणि अनिता राहुल इंगोले या दोघा पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अभय इंगोले आणि अनुप इंगोले ही त्यांची दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

Uttarkashi tunnel collapse : ‘रेस्क्यू ऑपरेशनचं यश भावूक करणारं’ मजूर बाहेर येताच पंतप्रधानांच्या रेस्क्यू टीमला शुभेच्छा

हा अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी या कुटुंबाला तात्काळ मदत केली. दोन जखमी मुलांना जामखेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरी अपघातानंतर आष्टी तसेच शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

‘शिस्त पाळली नाहीतर आम्ही अपात्र करु शकतो’; दीपक केसरकर आपल्या शब्दांवर ठाम

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं आहे.कारण नुकतचं चाळीसगाव येथील कन्नड घाटात (Kannada Ghat) मध्यरात्री भीषण अपघात झाला. देवदर्शनाहून परत असताता भाविकांच्या खाजगी वाहनाला गंभीर अपघात झाल्यानं कार खोल दरीत कोसळली. या दुर्दघटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 7 जण गंभीर जखमी झाले होते.

अपघातात बचावलेल्या मुलाने प्रंसंगावधान राखत घटनेची माहिती देताच रात्री एक वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या पथकासह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलीसांनी पोहोचून अपघातग्रस्तांना खोल खड्ड्यातून बाहेर काढले. रात्री घाटावर दाट धुके होते. पावसही सुरू असल्यानं मदतकार्यात अडथळा आला होता. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार पथके तयार करून जखमींना मदत करण्यात आली.

Tags

follow us