Uttarkashi tunnel collapse : ‘रेस्क्यू ऑपरेशनचं यश भावूक करणारं’ मजूर बाहेर येताच पंतप्रधानांच्या रेस्क्यू टीमला शुभेच्छा
Uttarkashi tunnel collapse : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी रेस्क्यू टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देखील दिली.
पंतप्रधान मोदींच्या रेस्क्यू टीमला शुभेच्छा
या रेस्क्यू ऑपरेशनच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली त्यामध्ये ते म्हणाले की, उत्तर काशीमध्ये आपल्या बांधवांचं रेस्क्यू ऑपरेशनचं हे यश भावूक करणारं होतं. टनलमध्ये जे लोक अडकलेले होते. त्यांना मी सांगू इच्छितो की, तुमचं साहस आणि धैर्य प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. मी तुमच्या सगळ्यांचं हित आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
उत्तरकाशी में हमारे श्रमिक भाइयों के रेस्क्यू ऑपरेशन की सफलता हर किसी को भावुक कर देने वाली है।
टनल में जो साथी फंसे हुए थे, उनसे मैं कहना चाहता हूं कि आपका साहस और धैर्य हर किसी को प्रेरित कर रहा है। मैं आप सभी की कुशलता और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं।
यह अत्यंत…
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2023
ही अत्यंत समाधानकारक गोष्ट आहे की, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपले हे बांधव त्यांच्या कुटुंबांना भेटणार आहेत. या सर्व मजुरांच्या नातेवाईकांसाठी हा एक आव्हानात्मक क्षण होता. त्यामुळे त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. मी या रेस्क्यू ऑपरेशनशी संबंधित सर्व लोकांच्या कार्याला सलाम करतो. त्यांची हिंमत आणि निश्चय यामुळे आपल्या मजूर बांधवांना नवीन जीवन मिळाला आहे. या रेस्क्यू ऑपरेशन मधील सर्व लोकांनी माणुसकी आणि टीम वर्क याचे एक अद्भुत उदाहरण जगासमोर ठेवलं आहे.
17 दिवसांपूर्वी काय घडलं?
12 नोव्हेंबरला सिल्क्यरा बोगद्याजवळ मजूर नेहमीप्रमाणे काम करत होते. त्यावेळी अचानक पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळण्यास सुरुवात झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अनेक कामगारांनी बाहेर पळ काढला. परंतु, त्याचवेळी अचानक निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला आणि 41 कामगार बोगद्यात अडकून पडले.
‘शिस्त पाळली नाहीतर आम्ही अपात्र करु शकतो’; दीपक केसरकर आपल्या शब्दांवर ठाम
ज्या बोगद्यात गेल्या 17 दिवसांपासून 41 मजून अडकून पडले होते त्या सिल्क्यरा बोगद्याचे 2340 मीटरचे काम पूर्ण झालेले आहे. तर उर्वरित काम सुरू होते. त्यावेळी अचानक मोठी दरड कोसळली. कोसळलेल्या दरडीचा ढिगाऱ्याची लांबी सुमारे 60 मीटर होती आणि कामगार 260 मीटरच्या वर अडकले होते.
कसं ठेवले तणावमुक्त?
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीसह विदेशातील अनेक संस्थांचीही मदत घेतली जात असून, आतील मजुरांसाठी आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता केली जात आहे. आत अडकलेल्या मजुरांची मानसिक स्थिती उत्तम ठेवण्याचे मोठे आव्हान तज्ज्ञांवर होते. यासाठी तज्ज्ञांकडून मजुरांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात होते. तणावमुक्त राहण्यासाठी बाहेरून मजुरांना योगा, प्राणायम आदी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याशिवाय वेळ घालवण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळ बोगद्याच्या आत पाठवण्यात आले होते.
Uttarkashi Rescue Operation : ‘बाहेर येताच मजूर गळ्यातच पडले’; देवदुतांनी सांगितला ‘तो’ क्षण
कुटुंबियांसोबत सुरू होता संवाद
बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद व्हावा यासाठी पाईपच्या मदतीने बोगद्यातील मजुरांना मोबाईल फोन, चार्जर पाठवण्यात आले होते. यामुळे या सर्वांना त्यांच्या कुटुबियांशी संवाद होत होता. तर अन्यवेळी वेळ जावा यासाठी काही जण विविध प्रकारे त्यांना फिट ठेवण्यासाठी गेम, व्यायाम आदी गोष्टी करत होते.
कोणत्या राज्यातील आहेत मजूर
गेल्या 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेले मजूर हे देशभरातील विविध राज्यातील आहेत. यात उत्तराखंडमधील 2, हिमाचल प्रदेश 1, उत्तर प्रदेशातील 8, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 3, आसामचे 2, झारखंड राज्यातील 15, ओडिशातील 5 मजुरांचा समावेश आहे.