Bala Banger on Walmik Karad : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांची चर्चा देशभरात होत आहे. महादेव मुंडे (Mahadev Munde Murder Case) यांच्या क्रूर हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बीड पुन्हा चर्चेत (Beed Crime) आले आहे. या जिल्ह्यात रोज काही ना काहीतरी घडामोडी घडत असतात. आताही विजयसिंह उर्फ बाळा बांगर (Bala Banger) यांनी वाल्मिक कराडबाबत गंभीर आरोप केले (Walmik Karad) आहेत. धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला (Dhananjay Munde) पोटनिवडणूक घ्यायची होती असा आरोप बांगर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत करण्यात यावा या मागणीसाठी आज परळी-अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात बाळा बांगर देखील होते. याचनवेळी त्यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले.
मोठी बातमी! महादेव मुंडे खून प्रकरण आता SITकडं, वाल्मिक कराडच्या मुलावरं बांगरचे गंभीर आरोप
या प्रकरणात मी काहीच बोलू नये यासाठी माझ्यावर दबाव येत होता. परंतु, या लोकांना माहिती नव्हतं की मी या प्रकरणातील जबाब दिला. आता मी घाबरणार नाही माघारही घेणार नाही. वाल्मिक कराडने परळीला कीड लावली. या प्रकरणात मी फरार होतो म्हणून मला बोलण्यास उशीर झाला. प्रशासनाने वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला अभय दिले असा आरोप बांगर यांनी केला.
कॉल रेकॉर्डिंग संदर्भात सध्या जी उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यावरही बांगर यांनी उपोषणाचा इशारा दिला. काल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती माझ्या पत्नीने सांगितले की ती रेकॉर्डिंग मी व्हायरल केलेली नाही. आता या रेकॉर्डिंग प्रकरणाचे सीडीआर काढावेत यासाठी मी पण उपोषणाला बसणार आहे असा इशारा बाळा बांगर यांनी यावेळी दिला. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आता मी पुढील महिन्यात पत्रकार परिषद घेणार आहे. महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडची टोळी गजाआड झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
त्यांना वाल्मीक कराडने अनेक प्रकरणांतून वाचवलं; बीडमधील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कुणाचं घेतलं नाव?
वाल्मिक कराडच्या प्लॅनबाबत बांगर यांनी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या वाईटावर होता. मुंडेंना संपवून त्याला पोटनिवडणूक घ्यायची होती. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी यांनाही मारण्याचा कट वाल्मिक कराडने रचला होता असा धक्कादायक आरोप बाळा बांगर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.