Download App

एसपींचा दडुंका ! बीडमधील सहाशे पोलिसांना दणका, थेट शंभर किलोमीटर दूर बदल्या !

Beed sp Navneet Kanwat Police personnel transfers: आता जिल्ह्यातील थोडेथिडके नाहीतर, सहाशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या केल्यात.

  • Written By: Last Updated:

Beed sp Navneet Kanwat Police personnel transfers: सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडाने बीड जिल्हा राज्यात गाजला. या प्रकरणातूनच गुन्हेगार, राजकारणी आणि पोलिसांची अभद्र युतीमुळे गुन्हेगारी कशी फोफावली हे समोर आले. पोलिस स्टेशनचा अधिकारी ते कर्मचारी या सर्वांचे लागेबांधे गुन्हेगारांशी आढळून आले. काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. यानंतर बीडचे (Beed sp) एसपी नवनीत कॉंवत (Navneet Kanwat) हे पोलिस दलात स्वच्छता मोहीम राबवत आहेत. आता जिल्ह्यातील थोडेथिडके नाहीतर, तब्बल सहाशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या केल्यात. एसपींनी कसा दडुंका चालविलाय, हेच पाहुया….

भुजबळांच्या दालनात कुणाचे फोटो? पत्रकाराचा प्रश्न अन् भुजबळांचं मन जिंकणारं उत्तर


पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बदल्या

तसं पाहिलं तर बीड पोलिस दलात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच बदल्या झाल्या नाहीत. एसपी नवनीत कॉंवत यांनी पहिल्यांदाच एकाचवेळी 606 पोलिस अंमलदारांच्या बदल्या केल्यात. एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या करताना एसपींसमोर चॅलेंज होते. परंतु त्यांनी पारदर्शक पद्धतीने बदल्या केल्यात. कुणाचीही वशिलबाजी त्यांनी चालू दिली नाही. त्यातून त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना एकप्रकारे कडक इशारा दिलाय. पाच वर्षात एकाच पोलिस ठाण्यात आणि एका तालुक्यात 12 वर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात. पोलिस ठाणे, पोलिस उपविभागीय कार्यालय असो की प्रमुख शाखा असो. यामध्ये मोजक्याच अंमलदारांची मक्तेदारी झाली होती.


सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रोटोकॉलमध्ये चूक, जनहित याचिका दाखल, कोर्टाने याचिकाकर्त्यालाच ठोठावला दंड


अनेक कर्मचाऱ्यांना राजकीय आशीर्वाद

अनेक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर राजकीय व्यक्तींचा हात, आशीर्वाद होता. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांचेही काही चालत नव्हते, अशा कर्मचाऱ्यांच्याही थेट लांबच्या तालुक्यात बदल्या करून त्यांना मोठा झटका दिलाय. एकाच पोलिस स्टेशनला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या 229, एकाच तालुक्यात 12 वर्षे काम करणाऱ्या 216, तर स्वतःच्या तालुक्यात नियुक्तीला असलेल्या 161 अशा 606 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात. एसपींच्या या आदेशामुळे अनेक पोलिस अंमलदारांचे मनसुबे उधळले गेले आहेत.


एलसीबीतील कर्मचाऱ्यांना झटका

प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा महत्त्वाची असते. परंतु या शाखेत गेल्यानंतर मलई मिळते म्हणून अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी ही शाखा हवी असते. यासाठी पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी हे वजन वापरून ही शाखा पदरात पाडून घेतात. या शाखेत कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या 15 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्यात. या शाखेत नव्याने कर्मचारी घेण्यासाठी एसपींनी काही पॅरामीटर ठरविलेत. एलसीबीत नियुक्ती देताना मेरिट बघितले जाणार आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज ही मागविण्यात आले आहे.

त्यामुळे वर्षांनवर्षे एकाच तालुक्यात, पोलिस स्टेशनला गोचिडासारखे चिकटून बसविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करताना रेकॉर्ड खराब असलेल्यांना परळीतून थेट आष्टी, आष्टीतून थेट अंबाजोगाई अशा ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही खुशी कही गम अशी अवस्था झालीय. बीडची गुन्हेगारी रोखण्यासाठी एसपींना कडक भूमिका घेतलीय. त्यातून बीडला पुन्हा चांगले दिवस दिसतील हे नक्की.

follow us