Beed Politics : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) बिगुल वाजले. आज भाजपने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानसभेआधी मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Rajendra Maske) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
मुंबईतील 14 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर; आशिष शेलारांसह त्यांचे मोठे बंधू विधानसभेच्या रिंगणात
मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदांचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे.
— Rajendra Maske (@Maske__Rajendra) October 20, 2024
मस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मस्के यांनी एक्स अकाऊंवटर एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदांचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे, असं त्यांनी म्हटलं.
Vidhansabha Election: अश्विनी जगतापांना मोठा धक्का, दीर शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर…
या संदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि पालकमंत्र्याकडून जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर कायम अन्याय झाला. मग आपलापक्षात सत्तेत असतानाही आपल्याला न्याय मिळत नसेल तर पक्षात राहण्याला काय अर्थ आहे? खरंतर सत्तेत जो पक्ष आहे, त्या पक्षाच्या आमदारांचं न ऐकता मित्र पक्षांचं ऐकल्या जातं, असं ते म्हणाले.
तालुका स्तरावर ज्या कमिट्या गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी नेमल्या होत्या. त्यात बदल करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पालकमंत्र्यानी नेमलं. पालकमंत्री आमदारांविरोधात जाऊन निर्णय घेतात. भाजपच्या कार्यकर्त्यांवर, आमदारांवर अन्याय होतोय, त्यामुळं हा निर्णय घेतला. पक्षाकडून भाजप कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं जात नाही, अशी खंतही मस्केंनी बोलून दाखवली.
दरम्यान, राजेंद्र मस्के बीडमधून विधानसभा लढणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आधीच जाहीर केले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मस्के यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. येत्या दोन-तीन दिवसांत आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे मस्क यांनी यावेळी सांगितले.
आता भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मस्के नेमकं कोणत्या पक्षात जाणार? की अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं.