Jalna Politics : राज्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत इनकमिंग वाढली आहेत. तर आघाडीतील तिन्ही पक्षांतील अस्वस्थता वाढली आहे. आघाडीतील नेते जरी महायुतीत प्रवेश करत असले तरी त्यांच्या येण्याने येथेही धुसफूस सुरू झाली. उदाहरणच द्यायचं झालं तर माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचं देता येईल. गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून अर्जुन खोतकर त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. यात त्यांनी भाजपवरही नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांच्या टीकेला गोरंट्याल यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अर्जुन खोतकर यांच्याच घोटाळ्याची सर्व प्रकरणे आता बाहेर काढणार आहोत, असा इशारा माजी आमदार गोरंट्याल यांनी दिला.
निवडणुकीत सरकारी गाड्यातून पैसे आले; भाजपमध्ये प्रवेश करताच कैलास गोरंट्याल यांचा धक्कादायक खुलासा
भाजप प्रवेशानंतर आज गोरंट्याल यांचं शहरात आगमन झालं. यावेळी त्यांचं चंदनझिरा परिसरापासून घरापर्यंत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. शहरात दाखल झाल्यानंतर गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिकेतील घोटाळ्यांच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही. महापालिका बैठकीतील निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे.
त्यामुळे त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उद्भवत नाही. खोतकर यांनीच कौटुंबिक वादापर्यंतच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या घोटाळ्यांची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी दिला. खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचे गोरंटयाल म्हणाले. काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली आहे. असं प्रत्युत्तर देखील कल्याण काळे यांना गोरंट्याल यांनी दिलं आहे.
धुळे रोकड प्रकरणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर अन् कमिटीचे चेअरमन.. अनिल गोटेंनी थेट नावचं घेतलं
मी कधीही कुणावर एकेरी भाषेत आरोप करत नाही. मी सुसंस्कृत घरातून आलो आहे. पाय धरुन गळा दाबण्याचं काम या लोकांनी केलं आहे. मी तसं कधीच करत नाही असा टोला त्यांनी खोतकरांना लगावला.
देवेंद्र फडणवीस आधीच्या सरकारमध्ये मंत्री असताना खोतकरांनी माझ्यावर आरोप केले होते. विभागीय आयुक्तांनी दोन उपजिल्हाधिकारी नेमले पण पुढे काय झालं. आम्हाला क्लिनचीट मिळाली असे गोरंट्याल यांनी सांगितले. गोरंट्याल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणारच असे खोतकर यांनी म्हटले होते. यावर गोरंट्याल म्हणाले, याबाबत दूध का दूध पानी का पानी आधीच झालेलं आहे. आता पुन्हा होऊ द्या. आमच्याकडेही त्यांची भरपूर प्रकरणे आहेत. त्यांनी सगळेच घोटाळे केलेत मग आम्ही त्यांना सोडणार का असा इशारा भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांना दिला.