छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati Sambhaji Nagar Riots) घडलेल्या दंगलीप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. राम नवमीच्या दिवशी संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झालं होतं. त्यानंतर दगडफेक आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले.
रामायणचे अभिनेते शूटिंग वेळी ओढायचे सिगारेट, एक दिवशी चाहत्याने पाहिलं, अन् मग….
छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगलीदरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तसेच सौम्य लाठीमारही केला. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
अजितदादांच्या डोक्यात नाशिक लोकसभेसाठी माणिकराव कोकाटे? गोडसे, भुजबळांना टेन्शन
याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हल्लेखोरांनी जवळपास 15 वाहनांचे नुकसान केले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. या दंगलीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही गटांतील नेते त्वेषाने एकमेकांवर आरोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही काल सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी दंगली, मात्र सभा होणारच…
राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम सरकार करत आहे. सरकारचा तोच हेतू आहे. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत आहेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
अजितदादांनी उपटले काँग्रेस नेत्यांचे कान; म्हणाले, गुडघ्याला बाशिंग बांधण्याची गरज नाही..
त्यावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी स्पष्टीकरण देत राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या जीभेला हाड नाही, त्यामुळे ते काहीही बोलत असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच कोण काय म्हणतंय? कोणावर आरोप करतंय? याबाबत आत्ता जी काही अस्पष्टता आहे त्याची स्पष्टता घटनेचे सर्व फुटेज पाहिल्यानंतरच होणार आहे. घटनेचे सर्व फुटेज शासनाकडे आहेत. या फुटेजची सध्या चौकशी सुरु असून चौकशीनंतर यामागे कोणं हे समोर येणार असल्याचंही मंत्री गिरीष महाजनांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि गुजरात, तसंच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पहायला मिळाला. सध्या तिन्ही राज्यात तणावपूर्ण शांतता आहे.