Chhagan Bhujbal on Manoj Jarange on : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली. त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. त्यामुळं मराठा आणि ओबीसी यांच्यातील लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यावरून मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) भुजबळांना इशारा दिला होता.त्यावर आता भुजबळांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर निलेश लंके भावूक; शिवसेनेतील राजकीय प्रवासाला दिला उजाळा
लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी भुजबळांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. भुजबळ म्हणाले की, मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, मग आमदारकीचे काय घेऊन बसला आहात.. माझे राजकीय करिअर हे पुढं न्यायचं की नाही , हे पक्षाचे आणि जनतेच्या हातात आहे. जनतेचं कोर्ट हे सर्वश्रेष्ठ आहे. जरांगे म्हणतात त्याप्रमाणे माझे मंत्रिपद गेले, राजकीय करिअर उद्वस्त होऊन मी घरी बसलो तरी मी ओबीसींच्या मुद्दयावर रस्त्यावर उतरून लढत राहणार आहे. राजकीय करिअर संपवण्याच्या धमकीा छगन भजुबळ घाबरत नाहीत, असं भुजबळ म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर निलेश लंके भावूक; शिवसेनेतील राजकीय प्रवासाला दिला उजाळा
पुढं बोलतांना भुजबळ म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे, घरांची व्यवस्था करत आहे. कर्जमाफीच्या योजना आखत आहे. शहरांमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहे उपलब्ध करून देतेय, वसतिगृहे नसतील तर विद्यार्थ्यांना पैसे देत आहे. मग आता काय अडचण आहे. मराठा समाजावर अन्याय करा असे आम्ही कुठे म्हणतोय? त्यांना वेगळे आरक्षण द्या, असे आम्ही म्हणत आहोत. एवढेच नाही तर सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना सध्या ओबीसींपेक्षा जास्त सवलती मिळत आहेत. आमचा यालाही विरोध नाही. मग आणखी काय पाहिजे तुम्हाला असा सवाल भुजबळ यांनी केला.
जरांगेंचा इशारा काय?
मनोज जरांगे छगन भुजबळांवर टीका करतांना म्हणाले, भुजबळांनी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला. आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहेत. दोन्ही समाजात द्वेष निर्णाण कऱण्याचे काम करत आहेत. आम्ही हे कदापि सहन करणार नाही, आता छगन भुजबळांना सुट्टी नाही, असा इशारा दिला.