‘आम्ही दोन्ही वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं पण …’ फडणवीसांनी सांगितले पराभवाचे गणित

‘आम्ही दोन्ही वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं पण …’  फडणवीसांनी सांगितले पराभवाचे गणित

Devendra Fadnavis On Maratha Reservation: आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दादर कार्यलयात आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) झालेल्या पराभवाच्या कारणे सांगत आम्ही मराठा समाजाला दोन वेळा आरक्षण दिले मात्र मराठा समाजामध्ये निर्माण केलेल्या खोटे नॅरेटिव्हमुळे मराठा आरक्षणाला विरोध (Maratha Reservation) करणाऱ्यांना मराठा समाजाने मतं दिले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या निकालाचं मला आश्चर्य वाटलं आहे. मराठवाड्यात विरोधकांनी मराठा समाजामध्ये खोटे नॅरेटिव्ह तयार केले. आम्ही दोन्ही वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलं, सारथी संस्था, फी सवलत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामडंळ, हॉस्टेल योजना या सारख्या गोष्टी आपल्या काळात झाल्या मात्र मराठा समाजाने 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मत दिले मात्र हे खोटे नॅरेटिव्ह जास्त काळ टिकणार नाही असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर विरोधकांवर टीका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी राज्यातले उद्योग पळवले असा खोटे नरेटीव्ह निर्माण केले होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळात राज्यात गुंतवणुकीत खाली होती त्यानंतरही रोज खोटं बोलत होते की उद्योग पळवले असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

तर उद्धव ठाकरेंवर टीका करत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मुंबईत मराठी माणसाने उद्धव ठाकरेंना मतदान केलं नाही, त्यांना एका विशिष्ट समाजाने मतदान केलं आहे. जर निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती तर कोकणात का दिसली नाही, कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. त्यांना पालघर, रत्नागिरी, ठाण्यात एकही जागा जिंकता आली नाही. त्यांना मुंबईत कुणामुळे जागा मिळाले हे सर्वांना माहिती आहे. मुंबईत देखील त्यांना मराठी माणसांनी मतदान केले नाही, तर विशिष्ट समाजाच्या मतांवर यांनी निवडणूक जिंकली असं देखील फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता पावसाळा जवळ आला आहे आणि पावसाळ्यात जे पेरलं जातं तेच उगवतं त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात मात्र पराभवाची देखील जबाबादारी उचलावी लागते यामुळे मी ही जबाबादारी स्वीकारली. देवेंद्र फडणवीस पळणारा माणूस नाही तर लढणारा माणूस आहे.

‘मी पळणारा नाहीतर लढणारा माणूस’, फडणवीसांचा विरोधकांना थेट इशारा

आमची प्रेरणा काय आहे तर चारी बाजूनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा सर्व गड जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कोणाला जर वाटत असेल की मी निराश झालो आहे तर ते सत्य नाही. असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज