‘मी पळणारा नाहीतर लढणारा माणूस’, फडणवीसांचा विरोधकांना थेट इशारा

‘मी पळणारा नाहीतर लढणारा माणूस’, फडणवीसांचा विरोधकांना थेट इशारा

Devendra Fadnavis : आज भाजपची (BJP) विधानसभा आढावा बैठक दादरच्या भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ‘मी पळणारा नाहीतर लढणारा माणूस आहे’. असं म्हणत विरोधकांना उत्तर दिला आहे. आज दादरच्या कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या यशामध्ये 2014 आणि 2019 मध्ये आपला वाटा होता मात्र 2024 मध्ये तो वाट आपण उचलू शकलो नाहीत. यामुळे आता आपल्याला पुन्हा एकदा नव्याने तयारी करावी लागेल आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीची (Mahayuti) सरकार आण्यासाठी जोराने काम करावे लागणार आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता पावसाळा जवळ आला आहे आणि पावसाळ्यात जे पेरलं जातं तेच उगवतं त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात मात्र पराभवाची देखील जबाबादारी उचलावी लागते यामुळे मी ही जबाबादारी स्वीकारली. देवेंद्र फडणवीस पळणारा माणूस नाही तर लढणारा माणूस आहे. आमची प्रेरणा काय आहे तर चारी बाजूनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा सर्व गड जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कोणाला जर वाटत असेल की मी निराश झालो आहे तर ते सत्य नाही. असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

तसेच अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. यावेळी फडणवीस म्हणाले, माझी अमित शहा यांच्याशी भेट झाली त्यांनी मला सांगितले काही दिवसात आपण महाराष्ट्रासाठी ब्लू प्रिंट तयार करू.

‘क्या हार मे, क्या जीत में..’ अटल बिहारी वाजपेयी यांची कविता म्हणत राजकीय कार्यकर्त्यांना धनंजय मुंडेंचे शांततेचे आवाहन

देशात मोदींना जनतेने समर्थन दिले त्याच वेळी ओडिशामध्ये आपलं सरकार आले. काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करत आहे मात्र त्यांना तीन निवडणुकीत जेवढ्या जागा मिळालेल्या त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत आम्हाला मिळाले आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसला उत्तर दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज