उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर निलेश लंके भावूक; शिवसेनेतील राजकीय प्रवासाला दिला उजाळा

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर निलेश लंके भावूक; शिवसेनेतील राजकीय प्रवासाला दिला उजाळा

Nilesh Lanke Meets Uddhav Thackeray :  माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून झाला आहे. (Uddhav Thackeray ) मी माझ्या अनेक भाषणांत सांगत असतो की मला शिवसेनेतील उग्र रूप धारण करायला लावू नका, अशी आठव सांगत अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी आपल्या राजकीय प्रवासाला उजाळा दिला आहे. (Nilesh Lanke) ते मुंबईत मातोश्री या निवास्थानी (Shiv Sena) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. तसंच, यावेळी त्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण काढली.

शिवसेनेतून राजकीय प्रवास ओबीसी आरक्षणावर पहिला हक्क मराठ्यांचा; मनोज जरांगे पाटलांनी सांगितला A टू Z इतिहास

मी उद्या लोकसभेत खासदारकीची शपथ घेण्यासाठी जात आहे. त्यापूर्वी मी आज उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी मी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्सीचेही दर्शन घेतलं असंही ते म्हणाले. तसंच, मी माझ्या राजकीय प्रवासाची सुरूवात शिवसेनेतून केली. शाखा प्रमुख पदापासून माझी सुरूवात झाली होती. त्यामध्ये, उपगट प्रमुख, गण प्रमुख, उप तालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उप जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख अशा शिवसेनेतील सर्व पदांवर मी काम केलं आहे असंही लंके यावेळी म्हणाले आहेत.

मोठा आनंद झाला रोज 20 लाख लोक टँकरची वाट पाहतात; मराठवाड्यातील पाणीटंचाई कधी संपणार? वाचा आकडेवारी

भेटीमध्ये आम्ही आमच्या जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदार आम्ही निवडून आणणार आहोत असा निर्धार केल्याचं सांगितलं. तसंच, यावेळी माझ्या प्रचाराला येता आलं नाही याबद्दल उद्धव ठाकरेंनी खंत व्यक्त केली. परंतु, मी खासदार झाल्याने त्यांना मोठा आनंद झाला असंही लंके यावेळी म्हणाले. तसंच, आनंद होणार हे साहजिक आहे कारण आम्ही एका कुटुंबाती आहोत असंही ते यावेळी म्हणाले.

काय करायचय ते करूद्या

डॉ. सुजय विखेंनाही यावेळी लंके यांनी टोला लगावला. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली असल्याचं विचारताच लंके म्हणाले, त्यांना काय करायचय ते करू द्या. एखाद्याला पराभव मान्य नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्यांना आता काही काम नाही ते असले उलटे कुटाने करत असतात असंही ते म्हणाले आहेत. अहमद नगर जिल्ह्यात मोठ्या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांचा पराभव करत निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज