Download App

…तर कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होवो; CM पदासाठी पाटोलेंचे ‘भद्रा मारुती’ कडे साकडे

  • Written By: Last Updated:

Nana Patole : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील समावेश होता. त्यावेळी नाना पटोले यांनी अशी शक्यता नाकारली होती. उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावल्याचे म्हटले होते. पण आता नानांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खुलताबादच्या भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जरी बक्ष या दर्ग्यावरही चादर चढवली. यानंतर त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेविषयी छेडले ते म्हणाले की मी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो, असे ते म्हणाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नको नको म्हणणारे नाना राजी झाल्याचे दिसून आले.

… पण, अनुभवातून माणसाची मतं बदलतात; राऊतांच्या ‘त्या’ टीकेवर अजितदादांचा पलटवार

ते पुढं म्हणाले की हे राज्य सरकार बधीर व नालायक सरकार आहे. हे भय व भ्रष्टाचाराच्या बळावर चालते. अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, हे अध्यक्षांनाही ठावूक नाही. याद्वारे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. काँग्रेस हे सर्व मुद्दे जनतेच्या दरबारात मांडेल, असे ते म्हणाले.

आजपासून राजस्थानचा नकाशा बदलला; अशी आहे गेहलोत सरकारची योजना

सध्या श्रावण महिना सुरु आहे. हिंदू संस्कृतीमध्ये हा महिना धार्मिक समजला जातो. आम्ही इतर कुणासरखा दिखावा करत फिरत नाही. मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात धार्मिक भावना दुखावण्याचे कोणतेही काम होत नाही, त्यामुळे मी सर्वधर्मीयांचे प्रतीक असणाऱ्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, असे ते म्हणाले.

Tags

follow us