आजपासून राजस्थानचा नकाशा बदलला; अशी आहे गेहलोत सरकारची योजना
Rajasthan new map : देशातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राजस्थान आजपासून 50 जिल्ह्यांचे राज्य होणार आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सरकारने नवा नकाशा जारी केला आहे. नवीन जिल्ह्यांसह राज्यात एकूण 10 विभाग होणार आहेत. सीकर, पाली आणि बांसवाडा हे तीन नवीन विभाग तयार करण्यात आले आहेत. नवीन जिल्हे असलेल्या भागात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत बटण दाबून नवनिर्मित जिल्ह्यांचे उद्घाटन करणार आहेत.
राजस्थानमधील नवीन जिल्ह्यांची घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मागील अर्थसंकल्पात केली होती. काही महिन्यांवर राजस्थान विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे गेहलोत सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. नवीन जिल्ह्यांच्या स्थापनेच्या कार्यक्रमात सर्व धर्मगुरूंना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आता बिनधास्त वापरा ‘X’; अडचणीत सापडलेल्या युजर्सना मस्क देणार कायदेशीर बळ
हे 17 नवीन जिल्हे निर्माण केले
अनुपगड, गंगापूर शहर, कोटपुतली-बहरोड, बालोत्रा, खैरथल-तिजारा, बेवार, जयपूर ग्रामीण, नीमकथाना, डीग, फलोदी, दिडवाना-कुचमन, जोधपूर ग्रामीण, सालुंबर, दुडू, केकरी, सांचोरे, शाहपुरा जिल्हे स्थापन केले जाणार आहेत.
मोठी बातमी : राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल, अधिसूचना जारी
महाराष्ट्रात नवीन 20 जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव
महाराष्ट्रात आतापर्यत वीस वर्षात दहा जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी केली जात आहे. यामध्ये मालेगाव, कळवण, शिर्डी किंवा संगमनेर, मीरा-भाईंदर, कल्याण, जव्हार, शिवनेरी, महाड, माणदेश, मंडणगड, आंबेजोगाई, उदगीर, किनवट, भुसावळ, खामगाव, अचलपूर, पूसद, साकोली, चिमूर आणि आहेरी अशा एकूण नवीन 20 जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी केली जात आहे.