आता बिनधास्त वापरा ‘X’; अडचणीत सापडलेल्या युजर्सना मस्क देणार कायदेशीर बळ

  • Written By: Published:
आता बिनधास्त वापरा ‘X’; अडचणीत सापडलेल्या युजर्सना मस्क देणार कायदेशीर बळ

Elon Musk Announcement For Legal Costs :  ट्विटरचा सर्वेसर्वा एलॉन मस्क नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ट्वीटरचे मालकी हक्क मिळाल्यानंतर मस्कने अनेक मोठे निर्णय घेतले होते. त्याच्या या निर्णयांमुळे मस्कला सर्वचं स्तरातून टीकेचा सामना करावा लागला होता. हे सर्व होऊनही मध्यंतरी मस्कने ट्विटरचा लोगा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा मस्कने मोठे पाउलं उचलत युजर्सला कायदेशीर मदत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच काय तर, यासाठी लागणाऱ्या निधीसाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. याबाबत मस्कने एक ट्विट केले आहे.

मोठी बातमी : राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल, अधिसूचना जारी

मस्कच्ं ट्विट नेमकं काय?

मस्कने कायदेशीर मदत आणि त्यासाठीचा आवश्यक निधीसाठीच्या मदतीची घोषणेबाबत एक ट्वीट केले आहे. ज्यात त्याने जर, तुमचा बॉस किंवा कंपनी ‘X’ प्लॅटफॉर्मवर एखादी गोष्ट पोस्ट किंवा लाईक करण्यासाठी तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर तुमच्या कायदेशीर लढाईचा सर्व खर्च आम्ही उचलू असे स्पष्ट केले आहे. तेही कोणत्याही आर्थिक मर्यादेशिवाय. याशिवाय युजर्सना कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचणी असल्यास त्या आम्हाला कळवा असे आवाहनही मस्ककडून करण्यात आले आहे.

मस्कच्या या ट्वीटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. ज्यात एका युजरने हा निर्णय अप्रतिम असल्याचे तर, दुसऱ्याने हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे म्हणत. मला असे बरेच लोक माहित आहेत ज्यांच्यासोबत बरेच चुकीचे घडले आहे. यात माझादेखील समावेश असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे एका युजरने यामुळेच मी इथे (ट्विटर) खूप पोस्ट करत असल्याची पोस्ट केली आहे.

दहशतवाद्यांकडून ब्रेन वॉश कसं केलं जातं? ऐका!

अनेक बदलांनंतरही ‘X’ हिट

काही दिवसांपूर्वी इलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलून ‘X’ असे केले. त्यानंतर 2023 मध्ये ‘X’ (ट्विटर) च्या मासिक युजर्सची संख्या सातत्याने वाढत असल्याचे सांगितले. ज्यात त्याने गेल्या महिन्यात एक ग्राफ शेअर केला होता. ज्यामध्ये एक्सने 541 दशलक्षचा विक्रमी यूजर्सबेसचा टप्पा ओलांडल्याचे सांगितले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अनेक पटीने अधिक आहे.

चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…

मस्ककडे मालकी हक्क आल्यानंतर आणि होणाऱ्या बदलांमुळे अनेक जाहीरातदार आणि युजर्स या प्लॅटफॉर्मला रामराम करतील तसेच यावरील ट्रॅफिक कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, एकूणच चित्र बघता अनेक धक्कादायक निर्णयांनंतरही ‘X’ वरील ट्रॅफिक सातवे आसमानपर असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube