Download App

शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde on Sharad Pawar : लोक विचारत होते की बीडच्या मातीतील 27 तारखेची सभा ही 17 तारखेच्या सभेची उत्तर सभा आहे का? त्यावेळी मी त्यांना सांगितले की ही उत्तराची सभा नाही तर बीड (Beed) जिल्ह्यातील जनतेच्या सेवेच्या उत्तरदायित्वाची सभा आहे. 17 तारखेच्या सभेत सांगितले की बीड जिल्ह्यातील लोकांनी साहेबांवर फार प्रेम केलं. पण त्या प्रेमाच्या पोटी साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे? पण साहेबांचं उत्तरदायित्व विकासाच्या माध्यामातून अजित पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे ही सभा उत्तराची नाही तर उत्तरदायित्वाची आहे, अशी टीका करत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या सभेला उत्तर दिले.

ते पुढं म्हणाले की एका गोष्टीची मात्र खंत वाटते. 17 तारखेच्या पूर्वसंध्येला माझा इतिहास विचारला आणि इतिहास विचारताना सांगितले की या जिल्ह्यातील मंत्र्याने तो इतिहास बीड जिल्ह्यातील जनतेसमोर मांडावा. शेवटी माझ्यासाठी देव आहेत, दैवत आहेत. शेवटी देवाने आज्ञा केल्यानंतर त्यांच्या भक्ताने पालन केलं पाहिजे. माझा इतिहास हा आहे की 2010 ला भाजपामधून मला काढलं कदाचित भाजपामध्ये असताना मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. दोन मतं कमी होते. त्यावेळी मी निवडून येऊ शकत नव्हतो. पण न मागता दोन मतं अजित पवार यांनी दिली. ते उपकार मी कधीही विसरु शकत नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

चंद्राला हिंदू राष्ट्र आणि शिवशक्ती पॉइंटला राजधानी घोषित करा; स्वामी चक्रपाणी यांची मागणी

हा उपकार माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात अजित पवार यांनी केला. तुमच्यासमोर जो धनंजय मुंडे दिसतो आहे घडवण्यात अजित पवार यांनी मदत केली असेल तर त्यांचे नेतृत्व स्विकारले तर चुक केली का? माझा राजकीय इतिहास बीड जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Hasan Mushrif : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं

भाजपच्या आमदरकीचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर गेलो. 2014 ची निवडणूक हारणार होतो माहित होतं पण लढलो, हार मानली नाही. त्यावेळीच्या कठिण परिस्थित अजित पवार यांनी माझ्याकडे विरोधी पक्षनेते पद दिले. लोक माझे सांगती या आत्मचरित्रात माझ्या कामाचे कौतुक केलं आहे. हा माझा इतिहास आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Tags

follow us