औरंगाबाद की छ.संभाजीनगर? : पवारांनी बसवलेला धुराळा फडणवीसांनी पुन्हा उडवला

Devndra Fadanvis On Sharad Pawar :  देवेंद्र फडणवीसांना पहाटेच्या शपथविधीबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबत अनेक खुलासे केले. एवढेच नव्हे तर, शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीतमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहण्यास मिळत आहे. फडणवीसांच्या आरोपांवर काल (दि. 29) पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. हा वाद कुठे […]

Letsupp Image   2023 06 26T112609.865

Devendra Fadanvis Sharad pawar

Devndra Fadanvis On Sharad Pawar :  देवेंद्र फडणवीसांना पहाटेच्या शपथविधीबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबत अनेक खुलासे केले. एवढेच नव्हे तर, शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीतमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहण्यास मिळत आहे. फडणवीसांच्या आरोपांवर काल (दि. 29) पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. हा वाद कुठे शांत होत नाही तोच फडणवीसांनी पवारांनी बसवलेला धुराळा पुन्हा एकदा उडवत जुन्या वादाला नव्याने वाचा फोडली आहे. ते गंगापूर येथे आयोजित मोदी @9 कार्यक्रमात बोलत होते.

Sharad Pawar यांचं स्टेटमेंट गुगली नाही, गाजराची पुंगी त्यावर उद्धवजींचा पक्ष त्रिफळाचीत झाला; शेलारांचा टोला

सभेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, भाजपनं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं केलं. तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी सभेतील नागरिकांना विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिला. पण पुढे बोलताना फडणवीसांची गाडी पवारांकडे घसरली. ते म्हणाले की, हे नामांतर पवार साहेबांना मान्य नसून, तुम्ही नाव काहीही करा मी, औरंगाबादच म्हणेन असे म्हटले होते. परंतु, पवार साहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी, छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मेळावा रद्द झाला पण पवारांचं ‘नगर’वर लक्ष कायम; विखे-शिंदेंना शह देण्यासाठी रविवारी मैदानात

जुन्या वादाला नव्याने फोडलं तोंड
दरम्यान, फडणवीसांनी नामांतराबाबत पवारांच्या विधानाची आठवण करून देत पुन्हा एकदा जुन्या वादाला उकरून काढत शमलेला वाद पुन्हा उकरून काढला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मी संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं वक्तव्य केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. दरम्यान, हे वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, ज्या वृत्त वाहिनीने मी संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं वक्तव्य पवारांनी केल्याचे दाखवले होते. मात्र, नंतर संबंधित वृत्तवाहिनीने पवारांनी असे कोणतेही विधान केले नसल्याचा खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली होती.

Exit mobile version