अमरावती : खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी अमरावती येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.शेतकरी मदत मागते होते पण ठाकरे सरकारने निकषाचे कारण देत मदत नाकारली, असे फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमधील कृषी महोत्सवात (Amravati Agricultural Festival) बोलत होते. यावेळी त्यांनी तृणधान्याचे देखील महत्व सांगितले.
आत्तापर्यंत कोणतेही सरकार सततच्या पावसाचे पैसे शेतकऱ्यांना देत नव्हते. पहिल्यांदा आपण सततच्या पावसाची व्याख्या तयार केली. एकीकडे शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त व्हायचे. दुसरीकडे सरकार म्हणायचे 65 मिलीमीटर पाऊस झाला नाही तुम्हाला मदत मिळणार नाही.
शेतकरी सांगायचा पीकाच नुकसान झालंय, काळं पडलं, शेंगा भरत नाहीत काहीतरी मदत करा. पण सरकार काही मदत करीत नव्हते. तुम्ही आमच्या निकषात बसत नाही. त्यामुळे तुम्हाला मदत मिळू शकत नाही असे मागचे सरकार म्हणायचे. आता आपण सततच्या पावसाची व्याख्या तयार केली. सततच्या पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आपण मदत केली, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
IPLच्या पहिल्याच मॅचमध्ये ‘या’ खेळाडूवर खिळल्या नजरा, कोण आहे अमेलिया केर?
यंदा G20 चा मोठा इव्हेन्ट आपल्या देशात होतोय. या G20 च्या परिषदेसाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान आपल्या देशात येतं आहेत. या सर्व पाहुण्यांच्या मेन्यूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणधान्य ठेवले आहेत. ताज हॉटेलमध्ये देखील तृणधान्यांचा मेन्यू ठेवला आहे. तृणधान्यांवर आधारित तयार केलेले पदार्थ पाहुण्यांनी आवडीने खाल्ले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तृणधान्याचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले.
कालपर्यंत आपण कमी पाण्यावर आणि रासायनिक खतं न वापरता अन्नधान्याचे उत्पन्न करीत होतो. आता मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे जमिनींचा पोत खराब झाला. रासायनिक खतांचा वापर कमी केला नाही तर पुढच्या दहा पंधरा वर्षात राजस्थान मधील वाळवंटासारख्या आपल्या जमिनी होण्याची भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
प्राचीन काळापासून आपल्या आहारात आणि कृषीचा महत्वाचा भाग तृणधान्य होते. अतिप्राचीन काळात देखील वेगवेगळे भरड धान्य आहारात होते. शेतकरी पिकवायचा तेच आपण खायचो. पण हळूहळू काळ बदलला आणि आपण पाश्चिमात्य अन्न ग्रहण करणं सुरु केलं. त्याचा परिणाम असा झाला की आपल्या शेतीवर ताण पडायला लागला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.