Dharashiv politics : धाराशिव जिल्ह्याचे राजकारण सध्या वेगळ्या वळणावर आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यात ऑपरेशन टायगर दोन राबवून धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांना पक्षात घेतली जाईल, असा बॉम्ब दोन दिवसांपूर्वी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक फोडला होता. ओमराजे निंबाळकर यांचे घनिष्ठ मित्र असलेले आमदार कैलास पाटील यांच्या बाबत सरनाईक यांच्या विधानाला अर्थ होता. परंतु भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी (Ranajagjitsinha Patil) कळंबमध्ये ऑपरेशन लोटस (Operation Lotus) राबवत एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुतीत आलेले आहेत. निंबाळकरांच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे भाजपमध्ये कही खुशी कही गम अशी अवस्था झालेली आहे. ओमराजे निंबाळकर आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आमदार कैलास पाटील हेही राणाजगजितसिंह यांचे राजकीय विरोधक आहेत. आता महायुती म्हटल्यावर सर्वच स्थानिक आमदार, नेत्यांना एका व्यासपीठावर जाणे आलेत. झेडपीचे अध्यक्ष व राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्जना पाटील व ओमराजे निंबाळकर अनेक कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्रपणे दिसत आहेत. त्याची राजकीय चर्चा सुरू आहे, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
कळंब नगरपालिकेची बलाबल
कळंब नगरपालिकेत भाजपचे सहा, शिंदे यांच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष असून, चार नगरसेवक आहेत. तर ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक आहेत. कळंबमधील ठाकरेसेनेचे नगरसेवक हे आमदार कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत. त्यावेळी जोरदार संघर्ष झाला होता.
‘काँग्रेसचा निर्णय देशविरोधी’; वंदे मातरमच्या मुद्द्यावर अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा
राणाजगजितसिंह पाटील पडले भारी
ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटाकडे गेल्याने काही नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेचे येतील, असे वाटत होते. परंतु कळंबमध्ये राणाजगजितसिंह पाटलांनी वेगळाच गेम खेळला आहे. कळंब नगरपालिकेतील ठाकरे गटाचे नऊ आणि काँग्रेसचे एक अशा दहा नगरसेवकांना आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी भाजपात घेतले आहे. तातडीने सोलापूरमध्ये पक्ष प्रवेश करून घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला आहे. उबाठा गटाचे गटनेते नगरसेवक संजय मुंदडा, जमील मंहमद कासीम खाटीक, इंदुमती जयनंदन हौसलमल, रुकसाना चाँदसाब बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशाताई सुधीर भवर, ज्योतीताई दीपक हाटकर, सफुरा शकील काझी, सागर सुभाष मुंडे, अर्चनाताई प्रताप मोरे हे भाजपात आले आहेत.
एका दगडात दोन पक्षी मारले
हे नगरसेवक ओमराजे निंबाळकरांबरोबर गेले असते तर शिंदेसेनेची ताकद वाढली असती किंवा आमदार कैलास पाटील यांच्याबरोबर राहिले असतील तर ठाकरे गटाची ताकद राहिली असती. परंतु राणाजगजितसिंह पाटलांनी हे नगरसेवक भाजपमध्ये घेऊन ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील या दोघांना जोरदार धक्का दिला आहे.
धाराशिव जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, धाराशिव आणि परंडा असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. तुळजापूर व परंड्यात महायुतीचे आमदार असून, आ. राणाजगजितसिंह पाटील आणि प्रा. तानाजी सावंत यांचा समावेश आहे. तर उमरगाला प्रवीण स्वामी, धाराशिवला आ. कैलास पाटील हे आमदार असून, दोघे ठाकरेंबरोबर आहेत. खासदारओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेत शिवसेनेत आलेले आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेची ताकद या जिल्ह्यात आहे.
दोन्ही शिवसेना राणाजगजितसिंह पाटलांच्याविरोधात आहेत. हे अनेकदा दिसून आलेले आहेत. त्यामुळे झेडपी ताब्यात घेणे, धाराशिव, तुळजापूर यासारख्या नगरपालिकांवर सत्ता भाजपने मिळविलेली आहे. त्या तुलनेत ठाकरे गटाला धक्का बसलेला आहे. त्यामुळे कळंबचे नगरसेवक फोडून राणाजगजितसिंह पाटलांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. दोन्ही शिवसेनेशी लढण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवलेली आहे.
