Download App

राम मंदिर निमंत्रणाचे राजकारण करु नका, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना सल्ला

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राम मंदिर (Ram Mandir) उदघाटनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. राम मंदिरावर हे काही भाजपची मालकी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. याववरुन संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निमंत्रणाचे राजकारण करु नका. राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही. प्रत्येक भारतीयांचे त्यामध्ये योगदान आहे. 22 तारखेच्या आनंदाच्या क्षणात कोणीही मिठाचा खडा न टाकता सहभागी व्हावे. कारसेवक कोणत्याही एका पक्षाचे नव्हते. सर्व पक्षांचे होते. या सोहळ्याला लिमिटेड करू नका, असा सल्ला आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी दिल्लीपुढं महाराष्ट्र गहाण ठेवलाय अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की महाराष्ट्र सोन्याने मढवलेला आहे. हा आंधळा आहे याला दिसत नाही. महाराष्ट्र संपन्न राज्य आहे, मात्र याला फाटके दिसते आहे. राऊतांनी थोडी लाज वाटू द्यावी. महाराष्ट्रावर देशाचं अर्थकारण चालतं, एवढं जरी समजलं तरी पुरे होईल.

महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या प्रवेशावरुन वाद सुरु आहे. यावर संजय शिरसाट म्हणाले की प्रकाश आंबेडकर प्रगल्भ आहेत. बाकीचे नेते त्यांना हलक्यात घेत असतील तर त्यांची घोडचुक आहे. त्यांननी सांगितले युती करा पण युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर जागा दाखवतील. महाविकास आघाडीची युती होणार नाही.

राज ठाकरेंच्या भेटीमागे CM शिंदेंचा पॉवर गेम; ‘इलेक्शन पॉलिटिक्स’ ‘उबाठा’ला देणार टेन्शन!

अमोल कोल्हे पण आजकाल डायलॉग मारायला लागले आहेत. अमोल कोल्हे तुम्ही मित्र आहात, ह्या राजकारणात पडू नका. मोठे लोक बोलतात तेव्हा आपण त्यांच्यात बोलणं योग्य नाही. तुम्हाला अजित पवार यांनीच खुर्चीवर बसवलं आहे. जो माणूस आपल्याला मोठं बनवतो त्याला विसरु नका. उगाच डायलॉग बाजी करू नका, असा सल्ला संजय शिरसाट यांनी अमोल कोल्हे यांना दिला.

नितीश कुमार हे फक्त काही दिवसांचे CM, लालूंनी रचलं चक्रव्यूह; केंद्रीय मंत्र्याचा दावा

पाणबुडी उद्योग गुजरातला गेला हे अजून निश्चित नाही. पण महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची कुणीही चर्चा करत नाही. असेच हिरे उद्योग बाबत झाले आहे, सरकार पाणबुडी उद्योग जाऊ देणार नाही. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जाणार नाही, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

follow us