नितीश कुमार हे फक्त काही दिवसांचे CM, लालूंनी रचलं चक्रव्यूह; केंद्रीय मंत्र्याचा दावा
Giriraj Singh on Nitish Kumar : पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष आणि आघाड्या राष्ट्रीय पातळीवर कामाला लागल्या. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, आघाडी-युतीच्या चर्चा अशा सर्व वातावरणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सत्ताधारी वा विरोधक सोडत नाही. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये लवकरच नेतृत्व बदल होणार असल्याचं विधान भाजपच्या केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) म्हटलं.
कर्डिलेंचा कारभार तर विखेंची साखर; तनपुरेंनी घेतला समाचार
गिरीराज सिंह यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, लालू यादव हे राजकारणात सक्रीय झाल्यानं आता नितीश कुमार यांचा खेळ संपला. नितीश कुमार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं, पण ते लालूजींच्या चक्रव्यूहात पूर्णपणे अडकले आहेत. आता नितीश कुमार हे आता फक्त काही दिवसांचे मुख्यमंत्री आहेत. लालूंनी नितीश कुमारांसाठी चक्रव्युह रचलं. त्या चक्रव्युवहाचा पहिला टप्पा होता अवधबिहारी यांना बिहार विधानसभेचे अध्यक्ष बनवणं. त्यांना पाच ते सहा आमदार कमी पडत आहेत. ते यायला तयार आहेत. त्यामुळं लालूजी नितीश कुमारांना कोणत्याही दिवशी मुख्यमंत्री पदावरून हटवू शकतात, असा दावा सिंह यांनी केला.
14 जानेवारीपूर्वी तेजस्वी मुख्यमंत्री होणार?
गिरीराज सिंह इथेच थांबले नाहीत. पुढं बोलताना ते म्हणाले, तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होऊ शकतात. नितीश कुमारांच्या बाजूच सर्व आमदार लालू प्रसाद यादव यांच्या बाजूने आहेत. त्यामुळं आता लालूंच्या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडायचे हे नितीश कुमारांसमोर आव्हान आहे. 14 जानेवारीपूर्वी एक घटना घडू शकते, या दिवशी राज्यात सत्तांतर होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.
‘नितीश कुमारांसाठी एनडीएचे दरवाजे बंद
गिरीराज सिंह पुढं म्हणाले की, एनडीएमध्ये नितीश कुमारांना स्थान नाही. नितीशबाबूंसाठी सर्व दरवाजे बंद आहेत. लालूजींनी आमदारांची तोडफोड करून सरकार स्थापन केले तर मध्यावधी निवडणुका होणार नाहीत.
राम मंदिराच्या संदर्भात विरोधकांवर निशाणा
राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला ‘इंडिया’ आघाडीचे अनेक लोक उपस्थित नसणार आहेत. त्याबद्दल गिरीराज सिंह म्हणाले, ‘नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत त्यांचे कोणीही नातेवाईक अयोध्येला भेटायला गेले नाहीत. यावरून विरोधी पक्षांचा आणि विरोधकांचा सनातनकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? हे लक्षात येतं. भारतातील केदारनाथ, बद्रीनाथ आणि काशीकडे तुम्ही जिकडे पाहाल तिकडे तीर्थक्षेत्र झगमगते. कोणी जावो वा न जावो, 22 तारखेला रामजन्मभूमीत प्रभू श्री रामाच्या प्राणाचे पावन होणार आहे, त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.
नितीश कुमार काय म्हणाले?
आमच्या पक्षाचे सर्व नेते एकत्र आहेत. भाजप नेते काय बोलतात याकडे मी फारसे लक्ष देत नाही. त्यांना काय म्हणायचे आहे ते म्हणू द्या. मी त्याला महत्त्व देत नाही. मला फक्त माझ्या राज्याचा विकास करायचा आहे, असं नितीश कुमार म्हणाले.