कर्डिलेंचा कारभार तर विखेंची साखर; तनपुरेंनी घेतला समाचार
Prajakt Tanpure News : खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून सध्या साखर व डाळ वाटपचे काम जिल्ह्यात सुरु आहे. यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी विखेंना शाब्दिक टोला लगावला आहे. साखर वाटप हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. त्यांनी हत्तीवरून साखर वाटावी परंतु हे करत असताना दुसरीकडे त्यांनी दुधाचे दर वाढवण्यासाठी अथवा कांद्याच्या विषयावर संसदेमध्ये आवाज उठवावा, असा खोचक टोला विखेंना लगावला. तर जिल्हा बँकेच्या कारभारावरून तनपुरेंनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्यावर देखील टीका केली. चेअरमन म्हणजे जिल्हाबँक नाही. त्यांच्या कामाची पद्धत आपण बाजार समितीत पाहिली असून ते नियम डावलूनच कामे करतात, अशी थेट टीका तनपुरे यांनी कर्डिले यांच्यावर केली.
“जावईबापू, तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करु शकतो” : कर्डिलेंचे संग्राम जगतापांना जाहीर आमंत्रण
नगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वप्रथम शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिराची माहिती तनपुरे यांनी दिली. त्यानंतर त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी शिवाजी कर्डिले व खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली.
Task fraud : ऑनलाईन जॉबच्या अमिषाने वेगवेगळ्या बॅंक खात्यांतून लुटायचे; गुजरातमधून दोघं ताब्यात
कर्डिलेंचा कारभार नियम डावलूनच…
नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये संगणक प्रणालीच्या नूतनीकरणसाठी कमी खर्च अपेक्षित असताना तब्बल 100 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा डाव आखण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी तातडीने एक नवीन एजन्सी सुद्धा नेमली गेली. वास्तविक हा खर्च 25 ते 30 कोटी रुपयांत झाला असता मग एवढा खर्च कशाला? असा सवाल यावेळी तनपुरे यांनी केला. तसंच, अनेक विषयांच्या संदर्भामध्ये आता तेथील संचालकांनी आवाज उठवत अनेक गोष्टींना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. चेअरमन म्हणजे जिल्हा बँक नाही. जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कसे काम चालते त्यांची पद्धत मी पाहिली असून ते नियम डावलूनच कामे करतात, असेही तनपुरे म्हणाले.
तुम्ही हत्तीवरून साखर वाटा…
खासदार सुजय विखे हे आपल्या मतदार संघात साखर व डाळ वाटप करत आहे. यावरून त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली. यावर तनपुरे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले कि, साखर वाटप हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. त्यांनी हत्तीवरून साखर वाटावी आमचे काही दुमत नाही यावर आपण बोलणे देखील योग्य नाही. मात्र हे करत असताना दुसरीकडे त्यांनी दुधाचे दर वाढवण्यासाठी अथवा कांद्याच्या विषयावर संसदेमध्ये बोलताना आपण कधी त्यांना पाहिले नाही व ऐकलेही नाही अशी टीका तनपुरे यांनी विखेंवर केली.