नितीश कुमार मोठा निर्णय घेणार? PM पदावरुन इंडिया आघाडीत घुसमट; अद्याप सस्पेन्स कायम…
Nitin Kumar News : इंडिया आघाडीत (India Alliance) मोठी खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतंय. इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचं नाव समोर आल्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, अधिकृतपणे नितीश कुमार नाराज असल्याचं समोर आलेलं नाही. नितीश कुमारांची इंडिया आघाडीत घुसमट होत असल्याचंही सांगण्यात येत असून त्यामुळे कुमार इंडिया आघाडी सोडणार असल्याचीही चर्चा रंगलीयं. त्यामुळे आता बिहारचं राजकारण वेगळ्या वळणावर जाणार असल्याचं चित्र पुढील काळात दिसणार असल्याचं भाकीत केलं जात आहे.
कॅनडा पोलिसांचा खुलासा, निज्जरचे मारेकरी कॅनडामध्येच लपलेले, लवकरच अटक होण्याची शक्यता
दिल्लीत जेडीयुची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला खुद्द नितीश कुमार उपस्थित राहणार असल्याने मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधीही नितीश कुमार यांचं संभ्रमाचं राजकारण पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नितीश कुमारांविषयी मागील काळात घडलेल्या राजकीय घडामोडी सविस्तर पाहुयात…
भाईजानचा चित्रपट लवकरच पार करणार 300 कोटींचा टप्पा; आठवड्यात कमावले ‘इतके’ कोटी
दिल्लीत नितीश कुमारांचे बॅनर :
दिल्लीतील जेडीयू कार्यालयाबाहेर नितीश कुमार यांच्याबाबत नवीन बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरवर ‘राज्याने ओळखले, आता देशही ओळखेल’ असं अधोरेखित करण्यात आलं आहे. तर या बॅनरवर राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा फोटो नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. याआधीही इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान ‘विजयासाठी नितीश हवा’ असं बॅनरबाजीवर अधोरेखित करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं.
नितीश कुमार यांनी अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली :
नितीश कुमार यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली होती. कंकरबाग येथील उद्यानात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतचे त्यांचे जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल करणं टाळलं होतं. याउलट माध्यमांच्या प्रश्नांवर हे सर्व सोडा.. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावरुन रविशंकर प्रसादांनी त्यांच्यावर टीका केली होती. जेटलींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण हे एनडीएसाठी हिरवा कंदील मानायचा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
DMDK पक्षप्रमुख अन् अभिनेते विजयकांत कालवश, कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास
गिरीराज सिंह आणि अश्विनी चौबेंचं धक्कादायक विधान :
बिहारमधील भाजपच्या दोन नेत्यांनी नितीश कुमार एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चेंला तोंड फोडले आहे. बेगुसराय येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांच्यासाठी गावातील कार्यकर्त्यांपासून ते दिल्ली कार्यालयापर्यंतचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद आहेत. तर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी तर नितीश कुमार यांना उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. या नेत्यांच्या वक्तव्याचा आधारावरुन एनडीएसाठी नितीशकुमार यांना दरवाजे बंद असल्याचं पाहायला मिळतंय पण राजकारणात जसं दिसतं तसं घडत नसतं.
कुमारांनी ललन सिंह यांच्यावर बोलणं टाळलं :
नितीश कुमार जेडीयुच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी ललन सिंह यांच्यावर बोलण्यास टाळलं असल्याचं दिसून आलं आहे. दिल्लीदौरा नियोजित असून ही सामान्य बैठक असल्याचं नितीश कुमारांनी सांगितलं आहे. उद्या जेडीयूची बैठक पार पडणार असून या बैठकीत कुमार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांच्या राजीनाम्याबाबतही नितीश कुमार यांनी बोलणं टाळलं आहे. त्यामुळे आता ललन सिंह यांची कारकीर्द संपणार असल्याच्या चर्चांनाही ऊत आलायं.