DMDK पक्षप्रमुख अन् अभिनेते विजयकांत कालवश, कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास
Vijayakanth Passes Away : अभिनेता ते राजकारणी विजयकांत (Vijayakanth ) यांचे गुरुवारी निधन झाले. ते कोरोना (corona) पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. येथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Actor and DMDK Chief Captain Vijayakanth passes away at a hospital in Chennai, Tamil Nadu.
He was on ventilatory support after testing positive for COVID-19. pic.twitter.com/LcT76Uawef
— ANI (@ANI) December 28, 2023
DMDK ची स्थापना 2005 मध्ये झाली
– अभिनेता विजयकांतने 2005 मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम पार्टीची स्थापना केली. DMDK 2011 ते 2016 पर्यंत तामिळनाडूमध्ये मुख्य विरोधी पक्ष होता आणि विजयकांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.
– 2006 मध्ये विजयकांत यांच्या पक्ष डीएमडीकेने तामिळनाडूतील सर्व 234 जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र विजयकांत एकटेच निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. उर्वरित सर्व जागांवर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 8.38 टक्के मते मिळाली.
अभिनेते साजिद खान काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७० वर्षी मालवली प्राणज्योत
– अशीच परिस्थिती 2009 च्या लोकसभा निवडणुकीत विजयकांत यांच्या पक्षासोबत घडली होती, जेव्हा पक्षाने राज्यातील 40 पैकी 39 लोकसभा जागा लढवल्या होत्या, परंतु एकही जागा जिंकली नव्हती. या दोन्ही निवडणुकांमध्ये विजयकांत यांच्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही.
– 2011 मध्ये विजयकांत यांच्या पक्षाने 41 जागांवर निवडणूक लढवली आणि 29 जागा जिंकल्या. या निवडणुकीत डीएमडीके हा जयललिता यांच्या पक्षानंतर (एआयएडीएमके) दुसरा पक्ष म्हणून उदयास आला, विजयकांत विरोधी पक्षनेते बनले. मात्र, त्यानंतर 2016 आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
-त्याचप्रमाणे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डीएमडीकेला एकही जागा जिंकता आली नाही.